शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मुनगंटीवार मनपानंतर आता जिल्हा परिषदही राखणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी होणार असून हैदराबाद पर्यटनाला गेलेले भाजपचे ३३ सदस्य सकाळी चंद्रपुरात दाखल होणार आहेत. दरम्यान, भाजप सदस्यांमध्ये काँग्रेसकडून फोडाफोडीच्या राजकारणाला संधीच मिळू नये, यासाठी सर्व सदस्य मतदानासाठी थेट सभागृहातच उपस्थितीत होतील, अशी रणनिती भाजपकडून तयार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअध्यक्ष व उपाध्यक्षपदाची आज निवडणूक : वनिता आसुटकर, संध्या गुरूनुले, अर्चना जिवतोडेंच्या नावांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहेत. मात्र चंद्रपूर जिल्ह्याचे भाजप नेते माजी अर्थ व नियोजन तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे जिल्हा परिषदेवर भाजपकडे मजबूत बहुमत आहे. नुकतेच महानगर पालिकेवर भाजपने वर्चस्व कायम राखले आता शनिवारी होत असलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवरही बहुमताच्या आधारे भाजपचेच वर्चस्व कायम राहील असे चित्र आहे. केवळ निवडणुकीची औपचारिकता पार पाडली जाईल, अशी स्थिती आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी होणार असून हैदराबाद पर्यटनाला गेलेले भाजपचे ३३ सदस्य सकाळी चंद्रपुरात दाखल होणार आहेत. दरम्यान, भाजप सदस्यांमध्ये काँग्रेसकडून फोडाफोडीच्या राजकारणाला संधीच मिळू नये, यासाठी सर्व सदस्य मतदानासाठी थेट सभागृहातच उपस्थितीत होतील, अशी रणनिती भाजपकडून तयार करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरूनुले, वनिता आसुटकर, नितू चौधरी, विद्यमान कृषी सभापती अर्चना जिवतोडे यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता लक्षात घेता भाजप नेत्यांनी २८ डिसेंबर २०१९ रोजी सदस्यांना हैदराबाद येथे पर्यटनवारीला नेले होते. नेत्यांनी आदेश दिल्यामुळे सदस्य हैदराबाद येथे पोहोचले. मात्र, त्याठिकाणीही काही सदस्यांच्या एका गटाने नाराजीचा सूर कायम ठेवला. त्यामुळे शहरातील प्रेक्षणीय स्थळांचा आनंद लुटण्याऐवजी नाराज सदस्यांनी हॉटेलमध्येच बसून राहणे पसंत केल्याची माहिती काही सदस्यांनी चंद्रपुरात पोहोचली. त्यामुळे भाजप नेत्यांना या निवडणुकीत स्वपक्षातीलच सदस्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. अध्यक्षपदाचे नाव सर्व सदस्यांसमोर जाहीर करावे, असा हट्ट या नाराज सदस्यांनी धरला होता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून अजूनही अध्यक्षपदाचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.सुधीर मुनगंटीवारांमुळे मावळणार अंतर्गत नाराजीजिल्हा परिषदेत भाजपचे ३३ व समर्थक अपक्ष ३ असे एकूण ३६ तर काँग्रेसचे २० सदस्य आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षपदावरून भाजपच्या काही सदस्यांमध्ये नाराजीची चर्चा असली तरी राज्याचे माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे संघटन कौशल्य व विकासाभिमुख धोरणांमुळे सहमती घडून भाजप मिनी मंत्रालयालयाचा गड राखणार, यात शंकाच नसल्याची चर्चा सुरू आहे.उपाध्यक्षपदासाठी दावे-प्रतिदावेविद्यमान जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे उपाध्यक्षपद सोपविले जाणार असल्याची चर्चा आहे. विद्यमान जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे हे चिमूर विधानसभा क्षेत्रातील असून, हे पद या विधानसभा क्षेत्राकडे जाण्याची शक्यता होती. मात्र, भोंगळे यांच्याकडे हे पद गेल्यास अध्यक्षपदासाठी चिमूर विधानसभा क्षेत्रातील महिला सदस्याच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. यासाठी सदस्यांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत. विद्यमान सभापती अर्चना जीवतोडे यासुद्धा आस लावून आहेत. मात्र, ऐनवेळी कोणते नाव समोर केले जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.काँग्रेस पुन्हा विरोधी बाकांवर ?जिल्हा परिषदेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. अध्यक्षपद महिला खुले प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर काँग्रेसच्या गटनेत्यांनी चाचपणी करून पाहिली होती. शिवाय, भाजपातील काही नाराज सदस्यांवर मदार ठेवून बैठकाही घेतल्या होत्या. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता आल्याने पक्षश्रेष्ठींकडून पाठबळ मिळेल, याचीही काँग्रेस सदस्यांना आस होती. मात्र बहुमतच नसल्याने अपेक्षा मावळल्या. काँग्रेसच्या सदस्यांचीही शुक्रवारी बैठक झाली. मात्र, विरोधी पक्ष म्हणूनच भूमिका बजावावी लागणार असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार