शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या खर्चाचे आकडे वित्त विभागाशी जुळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 05:00 IST

जिल्हा नियोजन समितीने नियतव्यय कळवूनही प्रशासनाला पुढील कार्यवाहीला विलंब हाेऊ लागला. लेखा व वित्त विभागाने स्मरण करून दिल्यानंतर काही विभागांकडून हिशेब सादर करण्यात आला. परंतु, वित्त विभागाशी आकड्यांशी ताळमेळ जुळत नसल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना दरवर्षी जिल्हा नियोजन समितीकडून नियतव्ययाची माहिती दिली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने २५ एप्रिलपर्यंत मागील वर्षाची सर्व देयके देण्याचे काम पूर्ण केले. आता मे महिनाही संपत असला तरी विविध विभागांना अजूनही खर्चाचा ताळमेळ करता आला नाही.  परिणामी, जिल्हा नियोजन समितीने नियतव्यय कळवूनही प्रशासनाला पुढील कार्यवाहीला विलंब हाेऊ लागला. लेखा व वित्त विभागाने स्मरण करून दिल्यानंतर काही विभागांकडून हिशेब सादर करण्यात आला. परंतु, वित्त विभागाशी आकड्यांशी ताळमेळ जुळत नसल्याची माहिती आहे.जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना दरवर्षी जिल्हा नियोजन समितीकडून नियतव्ययाची माहिती दिली जाते.   त्याप्रमाणे गतवर्षाचे दायित्ववजा जाता शिल्लक राहणाऱ्या रकमेच्या दीड पट कामांचे नियोजन संबंधित विभागांनी करणे अपेक्षित असते, अशी माहिती आहे. मात्र, दरवर्षी मार्चअखेरच्या कामांची देयके देण्याचे काम जूनपर्यंत चालले. त्यामुळे नियतव्ययाची माहिती मेमध्ये दिल्यानंतरही पुढील प्रक्रिया करण्यास ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत विलंब होतो. यंदा चंद्रपूर जिल्हा परिषदेची मार्चअखेरची देयके देण्याचे काम एप्रिलच्या सुमारास पूर्ण झाले. याच कालावधीत जिल्हा परिषदेवर प्रशासकराज सुरू झाले. यावर्षी प्राप्त झालेल्या नियतव्ययातील निधीचे नियोजन किमान जूनच्या आत करणे अपेक्षित होते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

स्मरण करून कानाडोळा   खर्चाचा हिशेब सादर करण्याबाबत जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडून विभागप्रमुखांना स्मरणपत्रेही पाठविण्यात आली. पण, याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे समजते. हा विषय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतल्याने ताळमेळ करून वित्त विभागाकडे फायली पाठविण्यात आल्या. काही विभागांनी केलेला ताळमेळ व वित्त विभागाच्या आकडेवारीत ताळमेळ बसत नाही.

कर्मचाऱ्यांची दमछाकदेयके देण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर विविध विभागांनी त्यांच्याकडील खर्चाच्या हिशेबाचा ताळमेळ करून त्याची वित्त विभागाकडून एप्रिलमध्येच पडताळणी करणे अत्यावश्यक होते. देयकांची कामे केल्यानंतर सर्व विभागप्रमुखांनी ताळमेळाकडे दुर्लक्ष केले. आता हिशेब सादर केल्यानंतर त्यातील खर्चाचे आकडे वित्त विभागाशी जुळेनासे झाले. त्यामुळे संबंधित कर्मचारी व विभागप्रमुखांची दमछाक सुरू आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद