लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अप्पासाहेब पवार कृषी महाविद्यालय बारामती येथील चतुर्थ वर्षाला शिकणारी भद्रावती येथील विद्यार्थिंनी मयुरी विलास बोबडे हिने भाजीपाला ठिकवून ठेवण्यासाठी शून्य ऊर्जा शीतगृह हा महत्त्वकांक्षी उपक्रम शेतकऱ्यांसाठी सुरु केला आहे. या अंतर्गत येरूर येथील शेतकऱ्यांना तिने शीतगृहाचे महत्त्व पटवून दिले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकºयांना फायदा होणार असून भाजीपाला जास्तकाळ टिकविणे शक्य होणार आहे.ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतगृहाचे प्रात्याक्षिक करून दाखविण्यात येत आहे. या उपक्रमाचे महत्त्व, उर्जेची बचत यावर मार्गदर्शन केल्या जात आहे. या शीतगृहामध्ये पालेभाज्या, फळभाज्या चार ते पाच दिवस टिकुन राहत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान टळणार असल्याचेही पटवून दिले जात आहे.लॉकडाऊनमुळे सर्व विद्यार्र्थी आपआपल्या गावाकडे परत आले आहे. आता शिथिलता मिळताच कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. मयुरीनेही चंद्रपूर तालुक्यातील येरूर येथे प्रात्याक्षिक करून दाखवित शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहित करणे सुरु केले आहे. प्रात्याक्षिक कार्यक्रमाप्रसंगी येरुरचे सरपंच मनोज आमटे, मनोज काकडे, वसंता काकडे, ग्रामसेवीका वंदना माथनकर यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
शून्य ऊर्जा शीतगृहामुळे चार दिवस भाजीपाला टिकविणे होणार शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 5:00 AM
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतगृहाचे प्रात्याक्षिक करून दाखविण्यात येत आहे. या उपक्रमाचे महत्त्व, उर्जेची बचत यावर मार्गदर्शन केल्या जात आहे. या शीतगृहामध्ये पालेभाज्या, फळभाज्या चार ते पाच दिवस टिकुन राहत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान टळणार असल्याचेही पटवून दिले जात आहे.
ठळक मुद्देयेरुर येथे प्रात्यक्षिक : विद्यार्थिंनीने पटवून दिले शेतकऱ्यांना महत्त्व