शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यात वीज तार लटकल्याने युवक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:39 IST

तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने नांदाफाटा-पिंपळगाव रोडवरील श्रीकृष्ण नगरीजवळ वीज खांब कोसळले. याठिकाणी रस्त्याच्या मध्ये विजेच्या तारा पडल्या. या तारा एका दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकल्याने गंभीर जखमी झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. ही घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देवीज कंपनीचा बेजबाबदारपणा : अखेर युवकाचा जीव वाचला

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने नांदाफाटा-पिंपळगाव रोडवरील श्रीकृष्ण नगरीजवळ वीज खांब कोसळले. याठिकाणी रस्त्याच्या मध्ये विजेच्या तारा पडल्या. या तारा एका दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकल्याने गंभीर जखमी झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. ही घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली.रमेश शनिगरापू (३२) रा. नांदाफाटा असे गंभीर युवकाचे नाव आहे. या विद्युततारा तीन दिवसांपासून रस्त्यावर पडून असतानासुद्धा नांदाफाटा येथील संबंधित कर्मचाऱ्याने त्या बाजूला केल्या नाही. विजतारा रस्त्यावर पडून असल्याबाबत माहिती स्थानिकांनी विजतंत्री डंभारे यांना दिली होती. दरम्यान, या तारांमुळे जवळपास पाच-सहा दुचाकी चालक जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेमध्ये दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नांदाफाटा येथील तेलगु वस्तीत वास्तव्य करणारा रमेश शनिगरापू हा युवक कामानिमित्त पिंपळगावला मोटारसायकलने जात होता. दरम्यान श्रीकृष्ण नगरी जवळील पडून असलेल्या वीज तारामध्ये तो अडकल्याने त्याच्या मानेवर व पायाला जबर मार लागला. सुदैवाने या अपघातातून तो बचावला. सध्या या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. अपघात झाल्यानंतर त्याला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे, अपघातानंतर त्याचे मित्र घटनास्थळी दुचाकी आणण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावरील वीज तारा दिसल्या. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंत्यांना माहिती देऊन लाईनमनने या तारा रस्त्याच्या बाजूल्या केल्या. या प्रकारामुळे मात्र वीज कंपनीचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. अशा घटना टाळण्यासाठी वीज कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :electricityवीज