शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मूल तालुक्यात रोजगाराअभावी युवकांचे बाहेर राज्यात स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:26 IST

वाढती बेरोजगारी : शासनाकडून आता उपाययोजनांची गरज

धनराज रामटेके लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यातील आकापूर मरेगाव स्थित एमआयडीसी आहे. मात्र मागील ३० वर्षांचा कालावधी लोटूनही अपेक्षित उद्योग स्थापन न झाल्याने आजही तालुक्यातील युवकांच्या हाताला काम नसल्याने तालुक्यात बेरोजगार युवकांची फौज निर्माण झाली आहे. उद्योगाअभावी युवक बेरोजगारीच्या खाईत जात असून, रोजगारासाठी युवकांचे बाहेर राज्यात स्थलांतर होत आहे. 

मूल तालुक्यात जोमाने विकास होत असतानाच अपुऱ्या सिंचन सोयी सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाला सामोरे जातानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती बिनभरोशाची झाली आहे. त्यामुळे युवकांचा ओढा औद्योगिक शिक्षणाकडे वळला. तालुक्यात एमआयडीसी असल्याने मोठमोठे उद्योग धंदे स्थापन होतील व आपल्या हाताला काम मिळेल या आशेने अनेक युवकांनी तांत्रिक शिक्षण घेतले. मात्र ३० वर्षांचा कालावधी लोटूनही आकापूर मरेगाव स्थित एमआयडीसी परिसरात अपेक्षित उद्योग स्थापन न झाल्याने सुशिक्षित युवकांची उपेक्षा झाली असून, रोजगाराभावी युवक नैराश्यात सापडला आहे. 

रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी आकापूर मरेगाव स्थित औद्योगिक महामंडळातील भूखंडाचे वाटप करण्यात आले. मात्र अनेक वर्षे लोटूनही उद्योजकांनी उद्योगधंदे उभारले नाही. आजच्या स्थितीत केवळ दोन तीन उद्योग सुरू आहेत. इतर उद्योग सुरू व्हावेत यासाठी लोकप्रतिनिधींनी कधीही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यामुळे हजारो सुशिक्षित युवकांचा हाताला काम नाही. 

बेरोजगार तरुण वळताहेत वाममार्गाकडे शिक्षणाच्या बाजारीकरणात गुरफटल्या गेलेल्या सुशिक्षित ग्रामीण बेरोजगार युवकांचा प्रश्न ऐरणीवर असून हजारो युवक नैराशेत गेले असून, असून झटपट पैसा कमविण्याच्या नादात वाममार्गाला लागले असल्याचे भयावह चित्र तालुक्यात निर्माण होत आहे. त्यामुळे तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे.

"मूल तालुक्यात एमआयडीसी आहे. मात्र या ठिकाणी मोठे उद्योग स्थापन न झाल्याने येथील स्थानिक बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे." - कृष्णा कुळमेथे, बेरोजगार युवक

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीchandrapur-acचंद्रपूर