लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : खडसंगी जवळील वेकोलि मुरपार फाट्याजवळ कार्गो ट्रक व दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. यात दुचाकीस्वार शैलेश बापुराव सरपाते (२२) रा. मूरपार या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर कुणाल कैलास नैताम रा. जामनी हा गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.मूरपार येथील शैलेश सरपाते व कुणाल नैताम हे दोघेही एमएच ३४ एएल ४३७२ क्रमांकाच्या दुचाकीने चिमूर येथील बाजारात अकराव्या वर्गात शिकणाऱ्या कुणाल नैतामला शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदी करून गावाकडे परत जात असताना चिमूर-वरोरा मार्गावर मुरपार गावाकडे वळत घेत असताना वरोराकडून भरधाव येणारा एमएच ०४ सीपी ३९५९ या क्रमांकाच्या ट्रकची दुचाकीला धडक बसली.या अपघातात दुचाकी दहा ते पंधरा फुटावर फेकल्या गेली. यामध्ये दुचाकी चालक शैलेश याचा जागीच मृत्यू झाला. तर कुणाल गंभीर जखमी झाला. कुणालला नागरिकांनी खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूरला हलविले. ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली. मात्र नाव कळू शकले नाही.झुडुपांनी केला घातचिमूर-वरोरा चौपदरीकरणाचे काम सुरू असून सदर रस्ता केंद्रीय रस्ते विभागाच्या अखत्यारित येतो. घटनास्थळावर वळण असल्याने व रस्त्याच्या बाजूला झाडाच्या फांद्या वाढल्याने येणाºया-जाणाºया वाहनधारकांना पुढील वाहन दिसत नाही. त्यामुळेच हा अपघात घडला.
ट्रक-दुचाकी अपघातात युवक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:56 IST
खडसंगी जवळील वेकोलि मुरपार फाट्याजवळ कार्गो ट्रक व दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. यात दुचाकीस्वार शैलेश बापुराव सरपाते (२२) रा. मूरपार या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर कुणाल कैलास नैताम रा. जामनी हा गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
ट्रक-दुचाकी अपघातात युवक ठार, एक जखमी
ठळक मुद्देखडसंगी-मूरपार मार्गावरील घटना