शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूरच्या रॅन्चोने बनविली इलेक्ट्रिक स्कूटर, ३० रुपयात १०० किमी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 15:08 IST

ही स्कूटर अवघ्या तीस रुपयांच्या चार युनिटमध्ये ६५ किलोमीटर प्रतितास गतीने शंभर किलोमीटरचे अंतर पार करते. बाजारातील अनेक चायनीज बनावटीच्या बाईकला ही इलेक्ट्रिक स्कूटर स्वदेशी उत्तम पर्याय ठरते आहे.

ठळक मुद्देइंधन बचतीसह प्रदूषणावरही बसेल आळा

जयंत जेनेकर

चंद्रपूर : सिमेंट सिटी म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर येथील एका रॅन्चोने स्वदेशी बनावटीची इलेक्ट्रिक स्कूटर साकारली आहे. त्याचे हे नवे संशोधन युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राकेश नागेश पेटकर असे त्याचे नाव आहे.

राकेश हा २०१८ च्या बॅचचा मेकॅनिकल विद्द्या शाखेतील चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. काही तरी नवे करण्याच्या जिद्दीने त्याने हे अभिनव संशोधन केले आहे. घरच्याच बजाज कंपनीच्या पेट्रोल स्कूटरचे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये त्याने रूपांतर केले आहे. ही स्कूटर अवघ्या तीस रुपयांच्या चार युनिटमध्ये ६५ किलोमीटर प्रतितास गतीने शंभर किलोमीटरचे अंतर पार करते. बाजारातील अनेक चायनीज बनावटीच्या बाईकला ही इलेक्ट्रिक स्कूटर स्वदेशी उत्तम पर्याय ठरते आहे.

इंधनाचे दर गगनाला भिडत चालले आहेत. त्यामुळे पेट्रोल बाईक न परवडणारी झाली आहे. तसेच प्रदूषणाने उच्चांक गाठला असताना ही पर्यावरणपूरक स्कूटर प्रत्येकालाच आकृष्ट करत आहे. राकेशने यासोबतच इलेक्ट्रिक बुलेटवरही काम सुरू केले आहे. लवकरच तो हा आविष्कार जगासमोर आणणार आहे. राकेशने भुवनेश्वर येथील स्काय रायडर इन्स्टिट्यूट येथून ऑटोमोबाईल डिझाईनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंगचा कोर्स केला आहे. त्याचे वडील नागेश पेटकर यांचे गडचांदूर येथे स्वतःचे दुचाकीचे गॅरेज आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर