सरकारचा निषेध : शेतकऱ्यांच्या समस्यांकडे वेधले लक्षचंद्रपूर : शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या भाजपा सरकारचा भूमी अधिग्रहण अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी चंद्रपुरात किसान पदयात्रा काढण्यात आली.भाजपा सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत काँग्रेसने राज्यभरात आंदोलन करण्याची रणनीती आखली असून गुरुवारी चंद्रपुरात किसान पदयात्रा काढण्यात आली. भाजपा सरकारचा भूमिग्रहण अध्यादेश रद्द करण्यात यावा, राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासह विविध समस्यांकडे पदयात्रेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देऊन शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.बागला चौकातून ही पदयात्रा काढण्यात आली. गिरनार चौक, गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हरीकिसन पूजाला, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, कुणाल राऊत, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महानगर अध्यक्ष नंदू नागरकर, मनपा स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, रामू तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, विनोद दत्तात्रेय, डॉ. आसावरी देवतळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव, सचिन कत्याल, राजू कासावार, आसिफ राजा, राजेश अडूर, हरीश कोपावार, रूचित दवे, सोहेल शेख, दीपक रेड्डी, भानेश जंगम आदींसह शेकडो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)
युवक काँग्रेसची किसान पदयात्रा
By admin | Updated: July 4, 2015 01:47 IST