शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

आयपीएल सट्ट्यात अडकले युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:19 IST

आयपीएलमध्ये किंग्ज इलेवन पंजाब आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्यादरम्यान फोनद्वारे सट्टा लावणाऱ्या एका युवकाला शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अटक केली़ सचिन रामचंद्र साहू असे अटकेतील युवकाचे नाव आहे़

ठळक मुद्देभौतिक सुखाचा लोभ : पालकांनो पाल्यांविषयी सावध राहा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आयपीएलमध्ये किंग्ज इलेवन पंजाब आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्यादरम्यान फोनद्वारे सट्टा लावणाऱ्या एका युवकाला शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अटक केली़ सचिन रामचंद्र साहू असे अटकेतील युवकाचे नाव आहे़ आरोपीजवळून टीव्ही, मोबाईल, सेटअप बॉक्स असा एकूण ४६ हजार २०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.युवकांमध्ये सध्या आयपीएलचा ज्वर सुरू आहे. आयपीएल सामन्यावर रोज कोट्यवधींचा सट्टा लागत असून सट्टेबाज आणि दलालाच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच रामनगर पोलीस पथकाने तीन सट्टेबाजांना अटक केली होती. यानंतर ही शहरातील दुसरी कारवाई आहे.आयपीएल सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून सचिन साहूला अटक केली. ठाणेदार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ठाकूर, कोंडावार, गुन्हे शोध पथकाचे मुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईने शहरातील सट्टेबाजामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.अल्पवयीन बालकांचाही समावेशचंद्रपूर : क्रिकेट सट्टा लावण्यात अल्पवयीन बालकांचाही समावेश असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे़ पैसा आणि अन्य प्रलोभनाच्या नादामुळे हायस्कूलमध्ये शिकणारे विद्यार्थी मोठ्या व्यक्तिंसोबत सट्टा लावत आहेत़ शाळेला बुट्टी मारून सट्टा पट्टी लावण्याच्या काही घटना शिक्षकांच्या नजरेत आल्या होत्या़ मात्र, बदनामीपोटी या घटनेची तक्रार करण्यात आली नाही़ शिक्षण घेऊन आयुष्य घडविण्याच्या वयात बालकांचे पाऊल चुकीच्या दिशेने वळत असल्याने शिक्षण क्षेत्रातही चिंता व्यक्त केली जात आहे़कारवाईनंतरही घेतला नाही धडाआयपीएलवर सट्टा घेणाऱ्या तीन युवकांना चंद्रपूर रामनगर पोलिसांनी बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अटक करून एक लाख ७१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ या घटनेनंतर सट्टा लावणाºया युवकांमध्ये जरब बसेल असे वाटत होते़ मात्र, भौतिक सुखाच्या नादात आणि झटपट कमाईच्या आमिषाला युवापिढी बळी पडत असल्याच्या घटना चंद्रपूर शहरात वारंवार घडत आहेत़ बुधवारी झालेल्या कारवाईत स्वप्नील देशमुख (२१), आदित्य चिंतावार (२१), प्रवीण क्षीरसागर (३१) यांना अटक झाली होता़ शहरातील वरोरा नाका आणि अन्य चौकांतील मोठ्या इमारतींमध्ये सर्रास सट्टा चालतो़ धाड टाकल्यानंतर रक्कम व साहित्य जप्त केले जाते़ मात्र, काही दिवसानंतर हा सट्टा पुन्हा सुरू होतो़ बुधवारी केलेल्या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरुन टीव्ही, मोबाईल, दुचाकी, सट्टयाचे कागदपत्र असा एकूण एक लाख ७१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़ पोलीस उपनिरिक्षक संदीप. टी. कापडे, निलेश वाघमारे, यांच्या नेतृत्वात केलेल्या या कारवाईची माहिती मिळताच सट्टेबाज पांगपांग झाले होते़ मात्र, काही दिवसांतच हा प्रकार पुन्हा सुरू झाला़