शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आईसमक्ष घरातच हातपाय बांधून तरुणाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST

अचानक रात्रीला काही संतप्त व्यक्ती नरेश गजभिये याच्या घरी चालून आले. घरात नरेशसोबत म्हातारी आई होती. आईच्या समोरच नरेशला त्याच्याच घरात पकडून हातपाय बांधले. तो पळून जाईल या भीतीने हातपाय बांधलेला दोर पलंगाला बांधला. यानंतर त्या व्यक्तींनी नरेशला जबर मारहाण केली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची वार्ता पसरताच राजुरा चांगलेच हादरले.

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : ३० वर्षीय तरुणाची काही अज्ञात लोकांनी त्याच्याच घरात  दोराने करकचून हातपाय बांधून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना राजुरा येथील रमाबाईनगर वाॅर्डात रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, ही घटना त्याच्या आईसमाेरच घडली. नरेश गजभिये (३०) असे मृताचे नाव आहे. या घटनेने राजुरा शहर चांगलेच हादरले आहे. घटनेची माहिती होताच राजुराचे ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांनी घटनास्थळ गाठले. मात्र घटनास्थळी कुणीही आढळले नाही. रमाबाईनगर वाॅर्डातीलच काही अज्ञात लोकांनी हे हत्याकांड घडवून आणल्याची शक्यता पोलीस सूत्राने वर्तविली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. वृत्त लिहिपर्यंत कुणालाही अटक झालेली नव्हती.प्राप्त माहितीनुसार, नरेश गजभिये याने सकाळी कुण्यातरी महिलेची छेड काढल्याची चर्चा होती. मात्र परिसरातील नागरिकांच्या मते नरेश छेड काढेल अशा स्वभावाचा नव्हता.  तो थोडा मंद होता. तो हातात दांडा घेऊन फिरायचा. अशातच अचानक रात्रीला काही संतप्त व्यक्ती नरेश गजभिये याच्या घरी चालून आले. घरात नरेशसोबत म्हातारी आई होती. आईच्या समोरच नरेशला त्याच्याच घरात पकडून हातपाय बांधले. तो पळून जाईल या भीतीने हातपाय बांधलेला दोर पलंगाला बांधला. यानंतर त्या व्यक्तींनी नरेशला जबर मारहाण केली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची वार्ता पसरताच राजुरा चांगलेच हादरले. रमाबाईनगर परिसरात स्मशान शांतता पसरली होती. या घटनेबाबत कुणीही बोलायला तयार नव्हते. पोलीस नरेशच्या आईकडून आरोपींबाबत माहिती घेत होते. 

हल्लेखोर दोघे होते? - नरेश गजभिये व त्याची म्हातारी आई दोघेच घरात राहात होते. नरेशचा विवाह झालेला नव्हता. नरेशच्या स्वभावाबाबत मात्र परिसरातील नागरिकांमध्ये काहीच तक्रारी नव्हत्या. हत्येच्या काही वेळापूर्वी नरेश हातात दांडा घेऊन घराबाहेर पडला होता. त्यानंतर  दोन अज्ञात व्यक्ती नरेशच्या घरात घुसले. काहीवेळाने नरेशची हत्या झाल्याचे कळले. या घटनेने सर्वांना धक्का बसला. नरेशचे हातपाय दोराने    बांधलेले होते. तो दोर पंलगालाही बांधून होता. अतिशय क्रूूरपणे हे हत्याकांड घडल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. नरेश दीड ते दोन वर्ष कारागृहात होता, अशीही चर्चा होती. मात्र  कोणत्या गुन्ह्यात हे कळू शकले नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी