शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

योगगुरु रामदेवबाबा शुक्रवारपासून मूल शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:03 IST

योग, आयुर्वेद आणि स्वदेशी वस्तूंवर योगगुरु रामदेव बाबा यांचे काम झपाट्याने सुरु आहे.

आॅनलाईन लोकमतमूल : योग, आयुर्वेद आणि स्वदेशी वस्तूंवर योगगुरु रामदेव बाबा यांचे काम झपाट्याने सुरु आहे. परंतु, येत्या काही दिवसात शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी ते काम करणार आहेत. येणारी पिढी शिक्षित झाली पाहिजे, तरच भविष्यात भारत सुजलम्-सुफलम् बनेल. नागरिकांनीही योग विस्तारसाठी प्रयत्न केले पाहिजे. यामुळेच समृद्ध, संस्कारमय, स्वच्छ आणि निरोगी आरोग्य राहू शकतो, असा आत्मविश्वास पतंजली सेवा समितीच्या मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. सुमना यांनी व्यक्त केले. त्या येथील कन्नमवार सभागृहात माध्यमांशी बोलत होत्या.जिल्ह्यात विकासाची गंगा आणणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत योगाचे शिक्षण व प्रसार करण्यासाठी मूल येथे योगगुरु रामदेव बाबा यांना येण्याची विनंती केली होती. त्यामुळे रामदेव बाबा मूल शहरात येणार असून १९ ते २२ फेब्रुवारी रोजी येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या प्रांगणात नागरिकांना योगाचे शिक्षण देणार आहेत. यासाठी पतंजली सेवा समितीच्या मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. सुमना मूल येथे आल्या होत्या. त्यांनी येथील कर्मवीर महाविद्यालयाचा परिसराची पाहणी केली.योगाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने योगगुरु रामदेव बाबा चंद्रपूर, जालना आणि अक्कलकोट येथे येवून योगाचे धडे देणार आहेत. १९ फेब्रुवारीपासून मूल येथे तीन दिवस या शिबिराचे आयोजन डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय व पतंजली सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.पतंजलीचे शहरध्यक्ष प्रभाकर भोयर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे अध्यक्ष अजय गोगुलवार यांच्या नेतृत्वात विविध समित्या गठित करण्यात येणार आहेत. या शिबिरात तीन दिवस सकाळी ५ ते ७.३० पर्यंत योगाचे धडे दिले जाणार आहे. ३ ते ५ पर्यंत महिलांसाठी आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती, मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. सुमना यांनी यावेळी सांगितले.यावेळी पतंजली सेवा समितीच्या राज्य प्रतिनिधी सुधा अलीमोटे, शोभा भगिया, भारती शेंडे, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरुनुले, भाजपचे जिल्हा संघटक राम लखिया, भाजपचे शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, न. प. उपाध्यक्ष नंदू रणदिवे उपस्थित होते. योग शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.