शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी आरोग्य योजनेच्या ओळखपत्रात चुकीची माहिती

By admin | Updated: November 29, 2014 23:18 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या ओळखपत्रात अनेक कुटुंबियाची माहिती चुकीच्या पद्धतीने नोंद करण्यात आली. आरोग्य ओळखपत्रे सिंदेवाही ग्रामपंचायतीमधून वितरीत केली जात आहेत.

सिंदेवाही : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या ओळखपत्रात अनेक कुटुंबियाची माहिती चुकीच्या पद्धतीने नोंद करण्यात आली. आरोग्य ओळखपत्रे सिंदेवाही ग्रामपंचायतीमधून वितरीत केली जात आहेत. परिणामी रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणार नसल्याने जनतेमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.ज्यांचे वय ६५ वर्षांचे आहे. त्यांच्या वयाची ओळखपत्रात ८७ वर्षांची नोंद आहे. याशिवाय ओळखपत्रात धक्कादायक माहितीची नोंद करण्यात आली आहे. ओळखपत्रात आईला पत्नी तर पत्नीला मुलगा म्हणून चुकीच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांची नावे गहाळ करण्यात आली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही आरोग्य विमा योजना शासनाने उपलब्ध करून दिली असून यात निवडक ९७१ गंभीर आजारांवर लाभार्थ्यांना उपचार मिळणार आहे. शासन निर्णयानुसार पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय, अन्न सुरक्षा योजना शिधा पत्रिकाधारकांच्या लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना आरोग्य सुविधा पुरविण्याची योजना कार्यान्वित केलेली आहे. विशेषत: आरोग्य सुविधा देण्यासाठी ओळखपत्रावर कुटुंब प्रमुखासह सदस्यांची नावे समाविष्ठ करून छायाचित्रावरून लाभार्थी रुग्णांची ओळख पटविणे गरजेचे आहे. परंतु सिंदेवाही ग्रामपंचायतीमार्फत वितरीत करण्यात आलेल्या ओळखपत्रामध्ये कुटुंब प्रमुखाचे वय, नाव, नाते संबंध चुकीचे नोंद करण्यात आले असून कुटुंबातील सदस्याची नावे व मुलाचे नावे गहाळ केलेली आहेत. परिणामी खर्चित उपचाराचा लाभ कुटुंबातील रुग्णांना मिळणार नसल्याने शासनाची आरोग्य योजना कुचकामी असल्याची प्रतिक्रिया लाभार्थी व्यक्त करीत आहेत. शासनाने गरीब कुटुंबाप्रती सदर योजना अंमलात आणली. परंतु प्रशासकीय यंत्रणेकडून योजना प्रभावीपणे राबविण्यात शासकीय कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत. याबाबत सिंदेवाही ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गरजु लाभार्थ्यांना आरोग्य सुविधाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने ओळखपत्रातील चुकीच्या नोंदी रद्द करून ओळख पत्रामध्ये कुटुंबियाची नावे समाविष्ट करण्याची मागणी केली जात आहे. चुकीच्या ओळखपत्रामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)