शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद लिपिकांचे लेखणीबंद आंदोलन

By admin | Updated: July 22, 2016 01:08 IST

चंद्रपूर जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी १९ जुलैपासून लेखनीबंद आंदोलनात सहभागी झाले असून

कामे रेंगळाली: जि.प. कर्मचारी लिपीकवर्गीय कर्मचारी बेमुदत संपावर चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी १९ जुलैपासून लेखनीबंद आंदोलनात सहभागी झाले असून त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील सर्वच लिपीकवर्गीय कर्मचारी सहभागी झाल्याने अनेक कामे रेंगाळलेली आहेत. लिपीकवर्गीय संवर्गात सहायक प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारील ज्येष्ठ सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक हे कर्मचारी सहभागी आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनी १५ जुलैपासून लेखनी बंद आंदोलन सुरु केले. परंतु चंद्रपूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी सहभागी न झाल्याने महाराष्ट्रात केवळ चंद्रपूर जिल्हा परिषदेचे लिपीकवर्गीय कर्मचारी सहभागी नाहीत, असे दृष्य दिसत होते. मात्र जि.प. लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे अध्यक्ष अजय टेप्पलवार यांनी तातडीने सर्व लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांची सभा घेतली. त्यात लेखनीबंद आंदोलनात सहभागी व्हावे किंवा नाही, याबाबत मते जाणून घेतले. कर्मचारी महासंघातर्फे सरचिटणीस प्रकाश सुरमवार यांनी कर्मचाऱ्यांना मतभेद व संघटनेतील वाद बाजूला ठेऊन एकजुटीने लेखनीबंद आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी प्रमुख पदाधिकारी इंदूताई कोटनाके, अजय डोर्लीकर, नंदकुमार गोल्हर राजकुमार चिकटे, लखदिवे, शरद रामटेके यांनी पुढाकार घेतला आहे. बेमुदत लेखनीबंद आंदोलन मागण्यापूर्ण होईपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सातत्याने शासनाकडे लिपीकवर्गीयांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती करीत असताना मागण्या मान्य न झाल्याने खेलनीबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेणे भाग पडले आहे. (प्रतिनिधी)