शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लेखक, कलावंतांनी पुरस्कार पलीकडचाही विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:24 IST

चंद्रपूर : सध्याची परिस्थिती फारशी चांगली नसली तरी नवीन पिढी विविध क्षेत्रांत सक्षमतेने पुढे येताना दिसते. मात्र, आजच्या अस्वस्थ ...

चंद्रपूर : सध्याची परिस्थिती फारशी चांगली नसली तरी नवीन पिढी विविध क्षेत्रांत सक्षमतेने पुढे येताना दिसते. मात्र, आजच्या अस्वस्थ भोवतालात लेखक, कलावंत व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरस्कार पलीकडचाही विचार करावा आणि प्रचलित पायवाटा नाकारून पुन्हा ताकदीने लेखन करावे, असे आवाहन नागपूरच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व वनराई संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी केले.

ज्येष्ठ लेखिका तथा समीक्षक डॉ. जया द्वादशीवार यांच्या जन्मदिनानिमित्त चंद्रपुरातील तिरूमल्ला सभागृहात शुक्रवारी वाङ्‌मयीन पुरस्कार करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख व समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे, पुरस्कार विजेत्या अरुण सबाने, शर्वरी पेठकर, डॉ. माधवी भट, डॉ. पद्मरेखा धनकर उपस्थित होते.

डॉ. गिरीश गांधी म्हणाले, लेखिका व समीक्षक डॉ. जया द्वादशीवार यांच्या लेखनाची उंची मोठी आहे. त्यांची संपूर्ण ग्रंथसंपदा नव्या पिढीला दिशादर्शक आहे. स्व. जयाताईंच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या मनात अपार कृतज्ञतेची भावना आहे. ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्यासारख्या चिंतनशील व्यक्तिमत्त्वासोबत समांतर पण परस्परपूरक राहून उंची गाठणारी अशी जोडपी आज कमी होत आहेत. आयटीपासून तर विविध क्षेत्रांत मुले-मुली पुढे जाताना दिसतात. मात्र, संयम सुटून विवाह तुटण्याच्या घटना आपण पाहतो आहोत. त्यामुळे या दोघांचा जीवन प्रवास अभ्यासण्यासारखा आहे, याकडे लक्ष वेधून डॉ. गांधी यांनी आशयसंपन्न लेखन करणाऱ्या चारही पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविक भाषणातून पुरस्कार विजेत्यांच्या ग्रंथांची सामर्थ्यस्थळे विशद केली. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी डॉ. शरद सालफडे व बाळ कुलकर्णी यांना शाल देऊन सत्कार केला. संचालन डॉ. सविता भट यांनी केले. नगरसेवक नंदू नागरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नागपूर, वर्धा व चंद्रपुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आयोजनासाठी डॉ. कन्ना मडावी, डॉ. सविता भट, शैला धनकर, वसू देशपांडे, पुष्पा नागरकर यांनी सहकार्य केले.

असे आहेत पुरस्कार विजेते

शर्वरी पेठकर यांना कादंबरीसाठी, नाट्य लेखन व अनुवादासाठी डॉ. माधवी भट, कवितांसाठी डॉ. पद्मरेखा धनकर आणि वैचारिक लेखनासाठी ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने यांना वनराई संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते डॉ. जया द्वादशीवार वाङ्‌मयीन पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह व प्रत्येकी २५ हजारांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली, या शब्दात विजेत्या लेखिकांनी मनोगत व्यक्त केले. पत्नीच्या स्मृतीनिमित्त कुणाचीही मदत न घेता स्वत:च पुरस्कार देण्याची घटना फार दुर्मीळ असून द्वादशीवार ही एक संस्थाच आहे, असा गौरव डॉ. गांधी यांनी केला.