शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लेखक, कलावंतांनी समकालीन वास्तव मांडावे, अभ्यासकांचा सूर

By राजेश मडावी | Updated: August 18, 2023 16:02 IST

सुनील कोवे यांच्या "उरलो जरासा मी " काव्यसंग्रहाचे प्रकाशन

चंद्रपूर :साहित्यात प्रचंड शक्ती असते. समाजाला विधायक वळण देण्याचे कार्य सकस लेखन करू शकते. त्यामुळे लेखक व कलावंतांनी सभोवतीचे समकालीन ज्वलंत वास्तव मांडावे, अशी अपेक्षा अभ्यासकांनी स्व. कवी सुनील कोवे यांच्या "उरलो जरासा मी " या कवितासंग्रह प्रकाशन सोहळ्यात बुधवारी (दि.१६) बल्लारपूर येथील कला वाणिज्य महिला महाविद्यालय सभागृहात व्यक्त केली.

झाडीबोली साहित्य मंडळांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी समीक्षक डॉ. धनराज खानोरकर तर उद्घाटक जि. प. माजी सदस्य वैशाली बुद्दलवार यांनी केले. प्रमुख पाहुणे भाष्यकार सुनील पोटे, झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर, ॲड. हरीश गेडाम, डॉ. श्रावण बाणासुरे, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, शालिनी सुनील कोवे उपस्थितीत होते.

व्यक्तीला जीवनात आलेले अनुभव, माहिती, ज्ञान यासारख्या गोष्टी मनात साठवून ठेवण्याची आणि भविष्यात त्याचा उपयोग व्हावा म्हणून शब्दबद्ध करून त्या स्मृती तेवत ठेवणारा हा कवितासंग्रह स्मृतींचे निरंजन आहे, असे प्रतिपादन डॉ. धनराज खानोरकर यांनी केले. झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष अरुण झगडकर यांनी सुनील कोवे यांच्या लेखनाचा आढावा घेतला. शालिनी सुनील कोवे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा. रामकृष्ण चनकापुरे यांनी केले. प्रशांत भंडारे यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिकchandrapur-acचंद्रपूर