शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांत अश्रू अन् पाण्याखाली बुडालेला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 05:00 IST

राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगत वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली परिसरातून वेकोलिने जिवंत नाल्याचे पात्र बदलून नवीन नाले तयार केल्यामुळे परिसरातील गावांना नेहमीच बॅक वॉटरचा फटका बसत आला आहे. याबाबत ‘लोकमत’ने गोवरी वसास्ती गावांसह इतर गावांना पुराचा धोका होण्याचे भाकीत महिनाभरापूर्वी  वर्तविले होते. 

ठळक मुद्देगोवरी येथील पूरग्रस्तांची व्यथा : पूरस्थितीबाबत लोकमतने वर्तविले होते भाकीत

नितीन मुसळे/प्रकाश काळेलोकमत न्यूज नेटवर्कसास्ती /गोवरी : पूराची पुसटशी कल्पनाही गोवरीवासीयांना नव्हती.  वसभर मुसळधार पाऊस पडल्यानंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास गावालगतच्या नाल्याला अचानक पूर आला. क्षणार्धात पुराचे पाणी पाहता पाहता घरात शिरले. आणि गोवरीवासीयांचा संसार पुराच्या पाण्याखाली आला.  संसार सावरताना  डोळ्यांतील अश्रू अंतर्मुख करणारे होते.राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगत वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली परिसरातून वेकोलिने जिवंत नाल्याचे पात्र बदलून नवीन नाले तयार केल्यामुळे परिसरातील गावांना नेहमीच बॅक वॉटरचा फटका बसत आला आहे. याबाबत ‘लोकमत’ने गोवरी वसास्ती गावांसह इतर गावांना पुराचा धोका होण्याचे भाकीत महिनाभरापूर्वी  वर्तविले होते. पुराचे पाणी गोवरी गावात शिरले आणि काही कळायच्या आत घरात शिरल्याने शेकडो कुटुंबांचा संसार  उघड्यावर आला. डोळ्यादेखत पुराचे पाणी घरात शिरत असल्याचे पाहून गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकायला लागला. घरातील अन्नधान्य, जीवन उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. राहत्या घरात पाच फुटांपर्यंत पाणी असल्याने अनेकांना कुटुंबातील साहित्य इतरत्र हलविण्याची दुर्दैवी वेळ आली. काही कुटुंबांनी चार पाच फूट पाण्यातून संसार पाण्याबाहेर काढत होते.   डोळ्यादेखत संसार  वाहून जात असल्याचे पाहून अनेकांच्या डोळ्यात   अश्रू तरळत होते. शेकडो कुटुंब उघड्यावर आले. शुक्रवारी गोवरी येथील सरपंच आशा उरकुडे, शिवसेना नेते बबन उरकुडे, ग्रामपंचायत सदस्य चेतन बोभाटे, कोतवाल चंद्रशेखर मादनेलवार व गावकऱ्यांना घेऊन तलाठी सुनील रामटेके यांनी पूरग्रस्त भागातील घरांचा मोका पंचनामा केला. यावेळी अनेक पूरग्रस्त गावकऱ्यांना पाण्यात वाहून गेलेला संसार पाहून अश्रू आवरता आले नाही.

पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावीगोवरी येथील शेकडो घरात पाणी शिरल्याने कुटुंब उघड्यावर आले.गावात पुराने सर्वत्र पसरल्याने हाहाकार झाला. वेकोलीच्या दुष्परिणामांचा मोठा फटाका गावकऱ्यांना बसला. त्यामुळे शासनाने पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर