शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

जगाचा पोशिंदा झाला रामभरोसे !

By admin | Updated: March 22, 2015 00:01 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणजेच अन्नदाता समजले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीवर अवकळा येत आहे.

गोवरी : भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणजेच अन्नदाता समजले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीवर अवकळा येत आहे. कधी सरकारकडून तोंडाला पाने पुसली जातात तर कधी निसर्ग कोपतो. यंदा खरीप हंगाम तर गेलाच; सोबत निसर्गाच्या लहरीपणामुळे रबी हंगामही दिलासादायक नाही. त्यामुळे जगाच्या पोशिंद्यावरच अन्नाविना उपाशी राहण्याची पाळी आली आहे.हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गराजाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली. दुबार-तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. महागडे बि-बियाणे जमिनीत पेरणीसाठी टाकल्यावर अपुऱ्या पडलेल्या पावसाने बियाणे उमलण्याधीच करपून गेले. शेतीचे सुरुवातीचे गणित चुकल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. घरी रडणाऱ्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा खर्च करीत उसणवारीने, कर्ज काढून कसीबसी शेती पिकविली.यावर्षी कमी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून गेला. एका बॅगला एक पोते सोयाबीन, अशी शेतीची बिकट अवस्था झाली. उत्पादनाचा उतारा घटल्याने शेतीवर केलेला खर्च निघणारा नाही, अशी विपरित परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली. मात्र कुटुंबाची संपूर्ण भिस्त शेतीवर अवलंबून असल्याने पोटाचा आधार म्हणून शेती करावी लागत आहे.शेतात राबणाऱ्या मजुरांचे भाव गगनाला भिडले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना नाईलाजाने कापूस वेचणीला पाठविण्याची वेळ जगाच्या पोशिंद्यावर आल्याने तो काळजातील दु:ख काळजात लपवून मोठ्या हिंमतीने संघर्षाला तोंड देत जगतो आहे. मात्र शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा एकही शेतकरी नेता पुढे आला नाही. निवडणूक काळात मतांचा जोगवा मागत आश्वासनाची खैरात वाटणारे राजकीय पुढारी कुठे गेले, हे कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांचा मालाला अत्यल्प दर असतानाही एकही नेता कास्तकारांच्या हितासाठी रस्त्यावर आला नाही. (वार्ताहर)