शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

जागतिक बँकेची चमू जिल्ह्यात

By admin | Updated: May 2, 2015 01:21 IST

जिल्ह्यात नव्याने जलस्वराज्य प्रकल्प टप्पा-२ राबविण्यास सुरुवात झाली असून,

चंद्रपूर : जिल्ह्यात नव्याने जलस्वराज्य प्रकल्प टप्पा-२ राबविण्यास सुरुवात झाली असून, या प्रकल्पाला जागतिक बँक सहकार्य करीत आहे. जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशनच्या कामाची स्थिती जाणून घेण्यासाठी नुकतीच जागतिक बँकेच्या चमूने चंद्रपूर जिल्हा परिषदेला भेट देऊन निवडक गावांची पाहणी केली.जागतिक बँक वॉशिंग्टन (अमेरिका) येथील अधिकारी लिआॅन वाँग, रोझर सुलान, पार्क, जागतिक बँक दिल्ली कार्यालयाने प्रतिनिधी प्रोणिता चक्रवर्ती, जागतिक बँक मुंबई कार्यालयाचे प्रतिनिधी मूर्ती यांनी नुकतीच जिल्हा परिषदेला भेट दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांच्या उपस्थितीत जनपथ सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी स्वच्छ भारत मिशन, जलस्वराज्य प्रकल्प टप्पा-२ याबाबत चमूसमोर केलेल्या कामांचे सादरीकरण केले. चमूने कामाविषयी येणाऱ्या अडचणी व आव्हाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते, कार्यकारी अभियंता मिलिंद चंद्रागडे, गटविकास अधिकारी प्रकाश तोडेवार, गोंडपिपरी गटविकास अधिकारी मोहितकर, पोंभूर्णा गटविकास अधिकारी व साधन संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गावभेटीदरम्यान भद्रावती तालुक्यातील चिरादेवी, घोडपेठ, चंद्रपूर तालुक्यातील चोरगाव, बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे भेट देऊन पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शौचालय व गावातील स्वच्छतेविषयी पाहणी केली. (प्रतिनिधी)