लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना अंमलबजावणीकरिता मंजूर लाभार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी जोडदेऊळ सभागृह पठाणपुरा येथे गुरुवारी कार्यशाळा पार पडली.कार्यशाळेचे उद्घाटन महापौर अंजली घोटेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक आयुक्त विजय देवळीकर, शहर अभियंता बारई, विजय बोरीकर, सतीश रेंगे, मोरे, राजीव पिंपळशेंडे आदी उपस्थित होते.मनपा हद्दीमध्ये आजपर्यंत घटक चार अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान अंतर्गत ४०७ व २८६ लाभार्थ्यांच्या अर्जास केंद्र शासनाकडून मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यापैकी प्रथम टप्प्यात ४०७ लाभार्थ्यांसाठी प्रक्रिया पूर्ण करणे सुरु आहे.त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यास आवश्यक मालकी हक्काची कागदपत्रे, जमिनीचा स्थळदर्शक नकाशा, कर पावती, स्टॅम्प पेपर अश्या विविध कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची पूर्तता करण्यास पलिकेतर्फे मदत व मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी सारिका शिरभाते, सौरभ गौतम, राहुल भोयर, नरेंद्रपवार, अतुल भसारकर, प्रतीक देवतळे तसेच अनेक प्रभातील नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अडीच लाखांचे अनुदान‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेतून प्रत्येक कुटुंबाला पक्के घर असायला हवे, यासाठी केंद्र ्रशासनामार्फत महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत घरकुलासाठी केंद्र शासनाकडून दीड लाख आणि राज्य शासनाकडून एक लाख रूपये, असे अडीच लाखांचे अनुदान मिळणार आहे. या योजनेला गती देण्यासाठी ज्यांची अर्ज मंजूर झाली आहेत. अशा ४०७ अर्जधारांना कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
आवास योजनेसंदर्भात मनपाची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:12 IST
महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना अंमलबजावणीकरिता मंजूर लाभार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी जोडदेऊळ सभागृह पठाणपुरा येथे गुरुवारी कार्यशाळा पार पडली.
आवास योजनेसंदर्भात मनपाची कार्यशाळा
ठळक मुद्देअर्जधारकांना मार्गदर्शन : लाभ घेण्याचे आवाहन