वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे येथे कामगार संघटना, त्यांची चळवळ आणि मागण्यांकरिता शेवटचे अस्त्र संप उगारणे हे ओघाने आलेच! कोळसा खाण, लाकडाचे शासकीय डेपो, रेल्वेचे महत्वाचे स्थानक आणि बीटीएस हे खासगी उद्योग. यातील मोठ्या संख्येतील कामगार व त्यांच्या विविध समस्या सोडविण्याकरिता त्या-त्या उद्योगात कामगार संघटना उभ्या झाल्यात. त्यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली.त्याकाळी कम्युनिस्ट पक्ष हा कामगारांचा सखा असे, मानले जायचे. त्यामुळे, बहुतेक उद्योगांमध्ये कम्युनिस्ट पक्षांच्याच कामगार संघटनाचे प्राबल्य होते. लाल झेंडा हे त्या संघटनेचे निशाण होते. काँग्रेसप्रणित इंटक आणि जनसंघ (आताचा भाजपा) प्रणित भारतीय मजदूर संघ (बीएमएस) हेही कार्यशील होते.बल्लारपूर पेपर मिल हे या भागातील सर्वात मोठे उद्योग सुरु झाले. १९५१ ला उद्योग तेथे कामगार संघटना या रुढार्थाने येथे कम्युनिस्ट पक्षांची कामगार संघटना तयार झाली. या संघटनेचे येथील अध्यक्ष ए.बी. बर्धन हे होते. या कामगार संघटनेसोबतच काँग्रेसप्रणित इंटकनेही प्रवेश केला होता. या दोन्ही कामगार संघटना क्रियाशील होत्या. उत्पादन सुरु झाल्याच्या काही वर्षानंतरच कम्युनिस्ट पक्षाच्या संघटनेने पगार वाढ व इतर काही मागण्यांकरिता संप पुकारला. इंटक युनियन मात्र या संपात उतरली नाही. संप फसला. पगार वाढ व इतर काही मागण्यांकरिता संत पुकारला. इंटक युनियन मात्र या संपात उतरली नाही. संप फसला. पगार वाढ झालीच नाहीच. उलट, संपात भाग घेतलेल्या काही कामगारांना घरी बसावे लागले. त्यामुळे, इंटकप्रणित बल्लारपूर पेपरमिल मजदूर सभेचे प्राबल्य वाढले. तिला मान्यताही मिळाली. या कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र तिडके (नागपूर) हे होते. स्थानिक अध्यक्ष गणपत तिडके तर महासचिव बी. के. वराडे हे होते. त्या काळात या उद्योगाची भरभराट वेगाने होत गेली. एकच्या चार पेपर मशीन्स बसल्या. त्याकाळी या भागातील सर्वच उदञयोग समूहाहून पेपरमिल कामगारांचे वेतन सर्वाधिक मानले जाई. १९६७ चे दरम्यान पी. जे. नायर यांचे कामगार नेतृत्व पुढे आले. ते पेपर मिलच्या अर्थविभागात लिपीक पदावर असल्यामुळे या कंपनीला मिळत असलेल्या अफाट नफ्याच्या तुलनेत कामगारांना आर्थिक हक्क व इतर सुविधा मिळत नाहीत, हे अभ्यासाअंती त्यांच्या लक्षात आले. मान्यता प्राप्त इंटकप्रणित संघटनांचे याबाबत मौन असल्याचे बघून, त्यांनी समांतर कामगार संघटना उभी केली. कामगारांना संघटीत करुन भाषणातून त्यांच्या हक्काची जाणीव त्यांनी करुन दिली. यामुळे कामगारांमध्ये जागरुकता निर्माण झाली. मूळ पगार, महागाई काय हे कामगारांना समजू लागले. व्यवस्थापनापुढे पगारवाढ व इतर काही मागण्या ठेऊन नायर यांनी संप पुकारला. तो १० दिवस चालला. कामगार मोठ्या संख्येने नायर यांच्या पाठीशी उभे झाले आणि मोठ्या संघर्षानंतर, नायर महासचिव असलेल्या बल्लारपूर पेपरमिल मजदूर सभेला मान्यता मिळाली. व्यवस्थापन कामगार प्रश्नाबाबत त्यांच्याशी बोलू लागले. कालांतराने नायर यांच्या एकाधिकार वाढल्याने काही कामगार प्रतिनिधींनी बंडाचा झेंडा उभा केला व समांतर संघटना उभी केली. याचे नेतृत्व खासदार नरेश पुगलिया यांनी स्वीकारले. समान एकाच नावाच्या या दोन्ही संघटनांचा आपापल्या अस्तिवाकरिता संघर्ष सुरु झाला. जिल्ह्यात काँग्रेसचे पुगलिया आणि गड्डमवार असे एकमेकांना पाण्यात पाहणारे गट होते. पेपर मिलचे कामगार क्षेत्र या दोन गटांचे रणमैदान झाले. कामगारांच्या समस्यांहून अधिक ‘कोणता गट वरचढ’ या संघर्षाला महत्व आले. संघर्ष पेटला आणि संप पुकारण्यात आला. तो दोन-अडीच महिने चालला. शेवटी, पुगलिया यांच्या नेतृत्वाखालील संघटना जिंकली. तिला मान्यता मिळाली. या संपकाळात हिंसाचार होऊन तीन कामगार प्राणाला मुकलेत. तेव्हापासून तर आजपर्यंत पुगलिया अध्यक्ष असलेली कामगार संघटनाच कार्यरत आहे. या दरम्यान भामसंने रमेश यादव यांच्या नेतृत्वात येथील रोजंदारी व ठेकेदारी कामगारांच्या हक्काकरिता लढा दिला. जिल्ह्यात उद्योग वाढले. तशाच कामगार संघटना वाढल्या. सिमेंट फॅक्टरी, कोळसा खाण, एमईएल, महाऔष्णिक केंद्र व इतर लहान मोठ्या ठिकाणी वेवगेगळ्या पक्षांच्या कामगार संघटना कार्यरत आहेत.पेपरमिलमधील वारंवारच्या संपामुळे बल्लारपूरची अर्थव्यवस्था बरेचदा कोलमडली. दोन महिन्याच्या (सन ७७-७८) संपाने तर येथील व्यापाऱ्यांचे कंबरडेच तोडून टाकले होते. कारण, पेपरमिल ही बल्लारपूरची अर्थवाहिनी होती व ती आजही आहे. सोबतच, वेकोलि, रेल्वे यामधील कामगारावरही येथील व्यापाºयांचा आर्थिक डोलारा उभा आहे
कामगारांसाठी संघर्षरत राहिली कामगार चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:36 IST
बल्लारपूर हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे येथे कामगार संघटना, त्यांची चळवळ आणि मागण्यांकरिता शेवटचे अस्त्र संप उगारणे हे ओघाने आलेच! कोळसा खाण, लाकडाचे शासकीय डेपो, रेल्वेचे महत्वाचे स्थानक आणि बीटीएस हे खासगी उद्योग. यातील मोठ्या संख्येतील कामगार व त्यांच्या विविध समस्या सोडविण्याकरिता त्या-त्या उद्योगात कामगार संघटना उभ्या झाल्यात.
कामगारांसाठी संघर्षरत राहिली कामगार चळवळ
ठळक मुद्देसंप जिंकले व फसलेही : चळवळींच्या आठवणींना उजाळा, अनेकांना मिळाला न्याय