शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रातील कामगारांची कंत्राटदाराकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:36 IST

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्य करणाऱ्या कामगारांना कंत्राटदार ठराविक वेतनापेक्षा कमी वेतन देत असून कामगारांची लूट करीत आहे. तसेच किमान वेतन व भविष्यनिर्वाह निधीची भरणाही करीत नसल्यामुळे कामगारांना भविष्य निर्वाह निधीपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आरोप

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्य करणाऱ्या कामगारांना कंत्राटदार ठराविक वेतनापेक्षा कमी वेतन देत असून कामगारांची लूट करीत आहे. तसेच किमान वेतन व भविष्यनिर्वाह निधीची भरणाही करीत नसल्यामुळे कामगारांना भविष्य निर्वाह निधीपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करावी, भविष्यनिर्वाह निधीचा भरणा करून थकित वेतन देण्याच्या मागणीचे निवेदन नगर परिषद वरोऱ्याचे सभापती शेख जैरुद्दीन यांच्या मार्गदर्शनात कामगारांनी जिल्हाधिकाºयांना दिले.चंद्रपूर जिल्ह्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामध्ये मागील अनेक वर्र्षांपासून कामगार कार्यरत आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून आठ हजार ५०० ते आठ हजार ९०० रुपये प्रतिमाह कामगारास वेतन देण्याबाबत निविदेतून सूचना दिल्या होत्या. त्यानुसार किमान वेतनाप्रमाणे सात हजार ८९४ रुपये प्रति महिना वेतन कामगारांच्या बँक खात्यात जमा करून भविष्यनिर्वाह निधीचा भरणा करणे बंधनकारक होते. मात्र कंत्राटदार कामगारांना तीन हजार रुपये प्रति महिना वेतन देत आहे. तर भविष्य निर्वाह निधीचासुद्धा भरणा केलेला नाही. त्यामुळे कामगार भविष्य निर्वाह निधीपासून कामगारांंना वंचित राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करावी, भविष्यनिर्वाह निधीचा भरणा करून थकित वेतन देण्याच्या मागणीचे निवेदन कामगारांतर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी सभापती शेख जैरुद्दीन यांच्यासह कामगार उपस्थित होते.