राजुरा : कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी मंगळवारी अंबुजा सिमेंट कंपनीच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार अॅड. संजय धोटे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण मस्की, प्रदीप वाजपेयी, अॅड. शैलेश मुंजे, उपरवाही सरपंच लक्ष्मी गेडाम, सरपंच संगीता मेश्राम, भाजपाचे राजुरा शहर अध्यक्ष बादल बेले, वामन तुराणकर, शिवाजी सेलोकर, महेश देवकते, मंगेश श्रीरामे उपस्थित होते.अंबुजा कंपनीने कामगारांच्या समस्या त्वरीत निकाली काढाव्या. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पामध्ये गेल्या त्यांना न्याय द्यावा, या भागातील शेतकऱ्यांना, कामगारांना डावलण्याचा प्रयत्न केल्यास अंबुजा सिमेंट कंपनीच्या गेटसमोर १० हजार भाजप कार्यकर्ते उपोषणाला बसणार व मागण्या पूर्ण होतपर्यंत उठणार नाही. असा इशारा आमदार संजय धोटे यांनी यावेळी दिला. कंपनी कामगारांना सोयीसुविधा पुरवित नाही. ज्या शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत करण्यात आली. त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आला नाही. एवढेच नाही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीने कामावर घेतले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. आंदोलनादरम्यान अनेकांनी आपले मत व्यक्त केले. संचालन मनोहर कुळसंगे, आभार राजेंद्र लोनगाडगे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
विविध मागण्यांसाठी कामगारांचे धरणे
By admin | Updated: November 25, 2014 22:52 IST