शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

कामावरुन काढल्याने कामगाराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2016 00:49 IST

वणी तालुक्यातील मुंधोली येथील ओबी उत्खनन करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये कामावर असणाऱ्या कामगाराला येथील व्यवस्थापनाने कामावरुन कमी केले.

नुकसान भरपाई द्या : करमजित सिंग कंपनी लिमि. मुंधोली येथील कामगारभद्रावती: वणी तालुक्यातील मुंधोली येथील ओबी उत्खनन करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये कामावर असणाऱ्या कामगाराला येथील व्यवस्थापनाने कामावरुन कमी केले. यामुळे त्रस्त झालेल्या कामागराने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्रीदरम्यान घडली.हनुमान मधुकर खामनकर (२७) रा. कुन्हाडा भद्रावती असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो गेल्या १० महिन्यापासून वणी क्षेत्रातील मुंघोली येथील करमजीत सिंग कंपनी लिमि. या वेकोलि येथील ओबी उचल करणाऱ्या कंपनीमध्ये वॉल्वो ड्रायव्हर या पदावर कार्यरत होता. २७ जानेवारीला हनुमान हा कामावर गेला असता त्याच्या हातून एक छोटा अपघात घडून वाल्वो पलटी झाला. त्यामुळे येथील प्रबंधक सलोदर सिंग यांनी हनुमानला एक आठवड्यासाठी विश्रांती घेण्यासाठी रजा दिली. रजा संपल्यानंतर हनुमान हा पुन्हा कामावर गेला असता प्रबंधकाने कंपनीचा वाल्वो पलटी झाल्याने कंपनीचे नुकसान झाले आहे, ते तू भरुन दे तेव्हाच तुला कामावर घेतो, असे म्हणून त्याला कामावर घेण्यात आले नाही. हा सर्व प्रकार येथील कामगार नथ्यू नवले, संदीप कंडे, गजानन पेटकर, पवन वराटकर, शंकर मडावी, ललित वर्मा, प्रकाश पानघाटे, संदीप आसूटकर या सर्व कामगार समोरच झाल्याने या घटनेची सर्व माहिती या कामगारांना होती. या कामगारांनी हनुमानने कामावरुन कमी केल्यानेच आत्महत्या केल्याचे ‘लोकमत’जवळ सांगितले. मृत हनुमान हा घरातील एकमेव कामावता होता. त्याच्या मागे म्हातारी आई व लहान भाऊ आहे. (शहर प्रतिनिधी)कंपनीचा स्थानिकावर अन्यायकरमजीत सिंग कंपनीमध्ये कामावर असणाऱ्या स्थानिक कामगारांनी सांगितले की येथे कामावर स्थानिक व प्ररप्रांतीय दोन्ही कामगार असून कंपनीच्या वतीने एक बंफर प्राईज देण्यात आले आहे. आठ तासात वाल्वो गाडीने ३० ट्रीपा मारल्यास चालकाला अतिरिक्त १०० रुपये देण्याचे प्रलोभन कंपनीने दाखविले आहे. त्या १०० रुपयाच्या नादात चालकाकडून काही अपघात झाल्यास त्याला कामावरुन कमी करण्यात येते. परंतु परप्रांतीयांसाठी हा नियम नाही. दरम्यान, कोणत्याही कंपनीला कामगारांना एकदम कामावरुन कमी करण्याचा अधिकारी नाही. हनुमान याला आत्महत्या करण्यास कंपनीने बाध्य केले आहे. त्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी, यासाठी कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी मजदूर संघाचे राजू यादव यांनी दिला आहे.