शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सर्व गावातील अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:04 IST

ग्राम विकास निधीमधील २५१५ योजनेंंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक गावातील अंतर्गत रस्त्यांची पूर्ण कामे करण्यात येणार असून एकाही गावातील रस्त्याचे काम अपूर्ण राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पायली येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ग्राम विकास निधीमधील २५१५ योजनेंंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक गावातील अंतर्गत रस्त्यांची पूर्ण कामे करण्यात येणार असून एकाही गावातील रस्त्याचे काम अपूर्ण राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.पायली-भटाळी येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण, क्रांकीट रस्त्याचे भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य वनिता आसूटकर, रोशनी अनवर खान, गौतम निमगडे, सरपंच मनिषा थेरे, उपसंरपच राजकुमार रायपुरे, पंचायत समिती सभापती वंदना पिंपळशेंडे, उपसभापती चंद्रकांत धोडरे, नगरसेवक रामपाल सिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, गावांचा विकास करताना सर्व नागरिकांना समान पायाभूत सुविधा निर्माण करुन देण्याचा आमचा माणस आहे. त्यामध्ये कसलाही भेदभाव केला जाणार नाही, अशी मी ग्वाही देतो. या सामाजिक सभागृहाचा उपयोग गावातील सर्व समाजाच्या नागरिकांनी करावा. तसेच या सभागृहाचा वापर व्यायाम शाळेसाठी करण्यात यावा, असेही ते म्हणाले. सदर भूमीपूजन करण्यात आलेली आर.ओ मशीन येत्या तीन महिन्यात सुरु करण्यात येणार असून पिण्याचे शुध्द पाणी या मशीनद्वारे सर्व नागरिकांना मिळणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, या दृष्टीने जिल्हयातील १०० गावांना आर.ओ. मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हयात मोठया प्रमाणात रोजगार निर्मितीचे काम सुरु असून यामध्ये चिंचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्राद्वारे महिला बचत गटांना रोजगार देण्यात आला आहे. पोंभूर्णा येथील कुक्कुटपालन केंद्रातर्फे एक हजार महिलांना काम देण्यात आले आहे. तसेच एक हजार महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत असून या महिलांनी तयार केलेल्या कपडयांची विक्री करण्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच बल्लारपूर येथे तीन हजार युवकांना डायमंड कटिंगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशा प्रकारचे विविध रोजगारयुक्त कामे जिल्हयात सुरु असून यामधून नागरिकांना रोजगार निर्माण करुन देण्याचे आमचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. पायली व भटाळी या गावाला वेकोलिपासून होणाऱ्या समस्याचे निराकरण करण्यासाठी लवकरच वेकोलिची बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्यात येईल आणि त्यामध्ये सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या लोकार्पण कार्यक्रमाच्या अनुषंगाने रक्तदान शिबिर, संकल्प आयपीएस बहुउद्देशीय संस्थेने जनप्रबोधन कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच टाटा ट्रस्टचे जिल्हा समन्वयक संदीप सुखदेवे यांनी युवकांची जबाबदारी व गाव विकासाच्या विविध योजना यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन शुध्दोधन मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन संदेश गणवीर यांनी मानले.