शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वर्क फॉर होमला शिक्षण विभागाचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST

५५ वर्षावरील शिक्षक तसेच विविध आजाराने त्रस्त असलेल्या तसेच महिला शिक्षकांना वर्क फॉर होमचे आदेश असतानाही चंद्रपूर पंचायत समितीसह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात या शिक्षकांनाही बोलाविल्या जात आहे. एवढेच नाही तर येण्याची सक्तीही करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसंताप : महिलाशिक्षकांसह ५५ वर्षावरील शिक्षकांनाही शाळेत येण्याचे बंधन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहे. धोका टाळण्यासाठी५५ वर्षावरील शिक्षक तसेच विविध आजाराने त्रस्त असलेल्या तसेच महिला शिक्षकांना वर्क फॉर होमचे आदेश असतानाही चंद्रपूर पंचायत समितीसह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात या शिक्षकांनाही बोलाविल्या जात आहे. एवढेच नाही तर येण्याची सक्तीही करण्यात आली आहे. त्यामुळे या शिक्षकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून वर्क फॉर होमची सुविधा उपलब्ध करून देण्याचे पत्रही पाठविले आहे.राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे शाळा सुरु न करता केवळ शैक्षणिक वर्ष सुरु केले आहे. दरम्यान, शाळेत गर्दी वाढू नये यासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महिला शिक्षक शिक्षक, आजारी तसेच ५५ वर्षांवर असलेल्या शिक्षकांना शाळेत बोलावू नये, असे आदेश असतानाही काही पंचायत समिती तसेच मुख्याध्यापक काम नसतानाही शिक्षकांना शाळेत बोलावित आहे.शाळेत शिक्षकांना बोलविण्यांसदर्भात मुख्याध्यापकांनी नियोजन करताना एकाच वेळी सर्व शिक्षक जमा होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही देण्यात आल्या आहेत. असे असतानाही शिक्षकांना बोलावून शाळेत बसवून ठेवल्या जात असल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. विनाकारण त्रास देण्याचा प्रकार काही मुख्याध्यापक करीत आहे. विशेष म्हणजे, महिला शिक्षकांनाही काम नसतानाही गुंतवून ठेवल्या जात आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक त्रस्त झाले आहे.या शिक्षकांना द्यावी लागेल सूटमहिला शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब, हृदयविकार आणि ५५ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या शिक्षकांना शाळेत बोलविण्यात येऊ नये, असे शासन निर्देश आहे. शाळा सुरळीत सुरु होतपर्यंत त्यांना वर्क फ्रॉम होम या पद्धतीने कामे देण्यात यावे असे शासनाचे निर्देश आहे.

जबाबदारीतून शिक्षकांची मुक्तताराज्यातील अनेक शिक्षकांना कोरोनाचे सर्वेक्षण आणि इतर विविध जबाबदाºया देण्यात आल्या आहेत. शिक्षकांना या जबाबदारीमधून मुक्त करण्याचे आदेश शिक्षणाने दिले आहेत. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही शिक्षकांना मुक्त करण्यात आले नाही.

शिक्षण उपसंचालकांनी पाठविले पत्र५५ वर्षावरील तसेच विविध आजाराने त्रस्त असलेल्या शिक्षकांना आणि महिला शिक्षकांना वर्क फॉर होमची सवलत द्यावी यासंदर्भात शासनाचे आदेश असतानाही पुन्हा ३० सप्टेंबररोजी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सवलत देण्याचे सांगितले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक