शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

कोरपना तहसील कार्यालयाची कामात दिरंगाई

By admin | Updated: July 22, 2014 23:57 IST

येथील तहसील कार्यालयात मागील काही दिवसांपासून जनतेच्या विविध शासकीय कामांना कमालीची दिरंगाई होत आहे. त्यामुळे या कार्यालयात कार्यक्षम व पुरेसा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग पुरविण्यात यावा,

कोरपना : येथील तहसील कार्यालयात मागील काही दिवसांपासून जनतेच्या विविध शासकीय कामांना कमालीची दिरंगाई होत आहे. त्यामुळे या कार्यालयात कार्यक्षम व पुरेसा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग पुरविण्यात यावा, अशी त्रस्त जनतेची मागणी आहे.१५ आॅगस्ट १९९२ ला कोरपना तालुक्याची निर्मिती झाली. स्वतंत्र तालुका झाल्याने राजुरा तहसील कार्यालयावरील एकूण कामाचा ताण कमी येईल व कोरपना तालुक्यातील जनतेची कामे जलदगतीने होतील अशी अपेक्षा होती. संजय गांधी निराधार योजनेसारख्या इतर योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल, रेशन कार्ड, विविध दाखले वेळेवर मिळतील अशा अपेक्षेने येथील जनता कोरपना तालुक्याकडे पाहत होती. मात्र तहसील कार्यालयातील एकूण कामकाजावर दृष्टिक्षेप टाकला असता जनतेच्या पदरी निराशाच आली. तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही कोरपना तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेला शासनाकडून अद्याप पदेच मंजूर करण्यात आली नाहीत. निराधारांना आधार मिळावा म्हणून १९८० मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. या दरम्यान, अनेक आमदार निवडून आलेत. मात्र कोरपना तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेची पदे मंजूर करण्यात कुणालाही यश आले नाही. या तहसील कार्यालयात नायब तहसीलदार-१, अव्वल कारकून-२, लिपीक-२, स्वच्छक-१, गोदाम रक्षक-१ अशी सात पदे आजघडीला रिक्त आहेत. बदली होऊन येथे रूजू होणे म्हणजे एक प्रकारची शिक्षा अशी धारणा बहुतेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची असल्याने त्यांच्याकडून प्रभावीपणे कामगिरी होत नसल्याचे म्हटले जाते. त्यामुळे कामात अधिकच दिरंगाई वाढत आहे.अन्न पुरवठा या महत्त्वाच्या विभागात अनेक वर्षांपासून नागरिकांची रेशनकार्डाची कामे रखडली आहेत. वास्तविक रेशनकार्ड ही जनतेच्या जीवनातील महत्त्वाची बाब आहे. या विभागाचे काम प्रभावीपणे होण्याची गरज आहे. अनेक गावातील रेशन दुकानात धान्य उपलब्ध असतानाही गोरगरीबांना ते मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक दुकानदाराकडून अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचे हप्ते ठरल्याचा आरोप होत आहे. या पोटी दर महिना एक लाखावर वरकमाई होत असल्याचाही गंभीर आरोप नागरिक करीत आहे. अलिकडेच येथील एका नायब तहसिलदारावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून रंगेहात अटक केली. मात्र खाबुगिरी संपुष्टात आली नाही.गडचांदूर, नांदाफाटा, कोरपना परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचे उत्खनन सुरू आहे. गडचांदुरात अनेक ठिकाणी रेतीचे साठे करण्यात आले. महसुल व पोलीस विभागाला हे माहित असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामध्ये ‘अर्थपूर्ण’ व्यवहार दडला आहे. कोरपना तहसील कार्यालयाची निर्मिती झाल्यापासून दोन-तीन अपवाद वगळता प्रभावीपणे काम करणारे तहसीलदार तालुक्याला मिळालेच नाहीत. (तालुका प्रतिनिधी)