वरोरा येथील धनोजे कुणबी सभागृहात शिवसेनेची आढावा बैठक व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम, भद्रावती-वरोरा विधानसभा संपर्कप्रमुख संजय काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते व संदीप गिऱ्हे, जिल्हा महिला संघटिका दीपाली माटे उपस्थित होते. स्नेहल शिरसाट वसई पारखी यांनी स्वागतगीत सादर केले. आंबेमानोरा येथील युवक-युवतींनी आदिवासी नृत्य सादर केले. याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये अविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार ना. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, नितीन मते, पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, प्रशांत कदम यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिवसेना तालुकाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी केले. संचालन माया बजाज यांनी केले. कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम, युवासेना उपजिल्हाप्रमुख मनीष जेठानी, ज्येष्ठ शिवसैनिक खेमराज कोरेकार, कंत्राटी कामगार सेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर अमरसिंह विश्वास, वरोरा शहर प्रमुख संदीप मेश्राम, नगरसेवक दिनेश यादव, ज्ञानेश्वर डुकरे, नंदू पडाल, भूषण बुरिले, संदीप जानवे आदींनी सहकार्य केले.
प्रत्येक घटकापर्यंत योजना पोहोचण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:14 IST