शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

११ कोटींच्या कामात ‘त्या’ जि.प. सदस्यांना झुकते माप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 05:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी जनसुविधा निधीसाठी मंजुरी दिली होती. परंतु, यावेळी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतीकडून प्रशासकीय मंजुरी होणार आहे. अनेक कामांचे प्रस्ताव येण्यापूर्वीच स्थायी समितीत जनसुविधा निधीबाबतचा ठराव घेण्यात आला होता. नियमानुसार प्रस्ताव आल्यानंतर स्थायी समितीत ठराव घेऊन त्याबाबतचे नियोजन जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले जाते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने स्थायी समितीच्या सभेत प्रस्ताव बोलाविण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा नियोजन समितीकडून जनसुविधा निधीचे वितरण केले जाते. यावेळी हा निधी जिल्हा परिषदेमधील काँग्रेसच्या सदस्यांना अधिक प्रमाणात मिळाला. मात्र, जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजप सदस्यांच्या वाट्याला तो कमी प्रमाणात आल्याने या निधीवरून पुन्हा राजकारण सुरू झाल्याच्या चर्चेला जिल्हा परिषद वर्तुळात उधाण आले आहे.जिल्हा परिषदेतर्फे यंदा जनसुविधा निधीसाठी २५ कोटींच्या नियोजनाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला. प्रारंभी ५ ते ६ कोटींचा निधी मंजूर झाला. त्यानंतर या निधीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यामुळे निधीत वाढ करून तो ११ कोटींपर्यंत पोहोचला. जिल्हा परिषद प्रशासनाने पाठविलेल्या नियोजनानंतर ११ कोटींच्या कामांमध्ये काँग्रेसच्या सदस्यांची कामे अधिक प्रमाणात घेण्यात आली.  त्या तुलनेत भाजप सदस्यांना दुय्यम स्थान दिल्याची चर्चा सत्ताधारी जिल्हा परिषद  सदस्यांमध्ये सुरू झाली. याचे पडसाद काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. भाजप सदस्यांनी सभागृहात याविषयी नाराजी व्यक्त केली       होती.

सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष भोवले- जिल्हाधिकाऱ्यांनी जनसुविधा निधीसाठी मंजुरी दिली होती. परंतु, यावेळी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतीकडून प्रशासकीय मंजुरी होणार आहे. अनेक कामांचे प्रस्ताव येण्यापूर्वीच स्थायी समितीत जनसुविधा निधीबाबतचा ठराव घेण्यात आला होता. नियमानुसार प्रस्ताव आल्यानंतर स्थायी समितीत ठराव घेऊन त्याबाबतचे नियोजन जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले जाते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने स्थायी समितीच्या सभेत प्रस्ताव बोलाविण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद