आचार्य ना.गो. थुटे : भद्रावती येथे पार पडला ग्रंथ प्रकाश सोहळाभद्रावती : शब्द हा कौरव नसतो. पांडवही नसतो अन् तांडवही नसतो, शब्द म्हणजे फक्त अनुभुतीचा मांडव असतो. या तिनही ग्रंथात अनुभुतीचा मांडव व्यथित करण्याचे काम या तिन लेखकांनी केले आहे, असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य ना.गो. थुटे यांनी काढले.झाडीबोली साहित्य मंडळ शाखा भद्रावतीच्या वतीने तीन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा येथील नगर परिषद सभागृहात पार पडला. येथील प्रसिद्ध लेखक खुशालदास कामडी लिखित वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (जीवन व कार्य), रमेश भोयर लिखित ‘अंतरंग’ (काव्यसंग्रह) व सुखदेव साठे लिखित ‘दिशादर्शक प्रश्नावली’ या तीन ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून आम. बाळू धानोरकर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना. गो. थुटे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून ग्रामगीता विश्वविद्यापीठ मोझरीचे कुलगुरू तथा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. बाळ पदवाड, रसिकराज साहित्य संस्था नागपूरचे अध्यक्ष डॉ. बळवंत भोयर, मुख्याधिकारी विनोद जाधव, ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर, झाडीबोली साहित्य मंडळ वरोराचे अध्यक्ष बापुराव टोंगे, ज्येष्ठ कार्यकर्ते गुरुदेव सेवा मंडळ जगन्नाथ गावंडे, प्राचीन इतिहास अभ्यासक प्रकाश पाम्पट्टीवार, प्रकाशक गिरीश बावनकुळे, झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. प्रा. सुरेश परसावार, सचिव पांडुरंग कांबळे आदी उपस्थित होते.आ. बाळू धानोरकर, डॉ. बाळ पदवाड, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बळवंत भोयर यांच्या हस्ते या तिन्ही ग्रंथांचे प्रकाशन झाले. यावेळी आ. बाळू धानोरकर म्हणाले की, तिन्ही लेखक भद्रावतीचे भूषण आहेत. साहित्य क्षेत्रात या तिघांचेही काम मोठे आहे. त्यांच्या साहित्याने आपल्याला एक दिशा मिळेल. झाडीबोली साहित्य मंडळाच्या ‘एक वाट साहित्याचा’, या कार्यक्रमासाठी हुतात्मा स्मारकाचे सभागृह न.प. द्वारे उपलब्ध करून दिल्या गेले असून अशा उपक्रमांना याहीनंतर पाहिजे ती मदत केल्हा जाईल असे उद्घाटक तथा नगराध्यक्ष अनिल धानोरकर म्हणाले. लेखक खुशालदास कामडी, रमेश भोयर व सुकदेव साठे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. बळवंत भोयर नागपूर यांना मानवता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.तसेच डॉ. प्रा. सुधीर मोते, संगीत कलावंत जनार्धन शिवरकर, लक्ष्मण सहारे, सुरेश साव, शंकर क्षीरसागर, पाल मॅडम, मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश परसावार, सचिव पांडुरंग कांबळे, प्रा. सचिन सरपटवार, पी.जे. टोंगे, आशालता सोनटक्के यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सचिन सरपटवार, स्वागतपर भाषण प्रा. डॉ. सुरेश परसावार, प्रास्ताविक पांडुरंग कांबळे तर आभार आशालता सोनटक्के यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
शब्द म्हणजे कौरव पांडव तांडव नाही
By admin | Updated: October 24, 2016 00:58 IST