शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

अस्मिता ‘सॅनिटरी नॅपकीन’ योजना महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:28 IST

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्य व सन्मान याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने अस्मिता योजनेचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदेवराव भोंगळे यांचे प्रतिपादन : अस्मिता योजनेचा चंद्रपुरात थाटात शुभारंभ

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्य व सन्मान याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने अस्मिता योजनेचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील महिला आपल्या आरोग्याबात अधिक जागरुक होण्यासाठी आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी अस्मिता योजना लाभदायक ठरणार असून याचा फायदा ग्रामीण भागातील शालेय किशोरवयीन मुलींना होणार आहे. महिलांच्या सन्मानाचे रक्षण अस्मिता योजना असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.महिला दिनानिमित्त आयोजित स्वच्छ भारत मिशन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अस्मिता सॅनिटरी नॅपकीन योजनेचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिवदास, महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे आदी उपस्थित होते.अस्मिता योजना ही बचत गटाच्या माध्यमातून घराघरात पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच त्यांचे जीवनमान व शैलीत फरक पडून त्यांना सन्मानाने जगण्याची नवी उमेद या माध्यमातून मिळेल. प्रत्येक महिलेने कोणत्याही गोष्टीकरिता पुढाकार घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात दारुबंदी झाली असून आता व्यसनमुक्तीसुध्दा महिलांच्याच माध्यमातून होऊ शकते. याकरिता महिलांनी गावाचे नेतृत्व करावे, असेही ते म्हणाले.मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर म्हणाले, महिलांनी स्वत:च्या शरिराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण स्वच्छता बाळगली नाही तर अनेक रोगांना दरवर्षी महिला बळी पडतात. स्वच्छता बाळगणे हे कर्तव्य आहे. महिलांना सन्मानाने जीवन जगण्याकरिता बचत गटामार्फत सुरु असलेल्या सॅनिटरी नॅपकीन अस्मिता योजनेचा आज शुभारंभ होत असून त्याचा लाभ जिल्हयातील ५३ हजार ४५९ जिल्हा परिषद अंतर्गत शालेय किशोरवयीन मुलींना होणार आहे. अस्मिता योजनेअंतर्गत हे सॅनिटरी नॅपकीन पाच रुपयांमध्ये आठ पॅडचे एक पॅकेट मिळणार आहे. प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक सचीन देशमुख तर संचालन तालुका अभियान व्यवथापक सुचिता पाटील यांनी केले.