राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष गणपती मोरे, योगेश पोतराजे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला.
आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तथा माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या कार्याची महती विषद केली. आजच्या स्त्रियांनी सावित्रीबाईंच्या कार्याचे महत्त्व जाणून सावित्रीबाईंच्या विचारांना अंगीकारावे, असे सांगण्यात आले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या बल्लारपूर शाखेच्या वैशाली पोतराजे, सविता मोरे ,रुचिता नारले ,पायल पायपरे, शारदा ठेंगणे, माया गवाने, शकुंतला वेलादी, अनिता निरांजने, सविता निरांजने, मेघा भाभले, कौशल्या मानकर, माया नंदेश्वर, कामिनी बाई मेश्राम, दीपा मानदांडे, कांता निरांजने,, लता पोतराजे,सुलभा पोतराजे,सावित्री ठावरी,पार्वती मोरे,साधना निरांजने आदी उपस्थित होत्या.