शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात धडकलेल्या महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:01 IST

Chandrapur :

लोकमत न्यूज नेटवर्क पोंभूर्णा : तालुक्यातील जामतुकूम व रामपूर दीक्षित येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याने अनेकजण व्यसनांच्या आहारी गेले. कुटुंबात कलह निर्माण झाला. अवैध दारू विक्रेत्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त महिलांनी पोंभूर्णा गुरुवारी (दि. २६) पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता.

जामतुकूम ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. मात्र, काहींनी जामतुकूम व लगतच्या रामपूर दीक्षित गावात अवैध दारू व्यवसाय सुरू केला. आहे. देशी, विदेशी व मोहफुलाची दारू आणून गावात विक्री करीत आहेत. यामुळे गावातील वातावरण कलुषित झाले. महिलांना याचा त्रास होत आहे. अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याच्या मागणीला घेऊन जामतुकूम येथील महिलांनी गावात सभा घेतली. त्यानंतर निवेदन देण्यासाठी पोंभूर्णा ठाण्यात धडकल्या. यावेळी माजी पंचायत समिती सभापती रिना बोधलकर, गाव दारूबंदी समितीच्या अध्यक्ष उषा भुरसे, उपाध्यक्ष आशा आलाम, सचिव कोमल कोमलवार, सुजाता मामडपल्लीवार, अंजना भलवे, शीतल गद्देकार, कल्पना नैताम, अरुणा वाडगुरे, प्रेमिला सिडाम, विद्या बुरांडे, ज्योती कतरे, रिना घोंगडे, अर्चना कोमलवार, महिला बचत गटांचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. 

निवेदन देताना पोलिस धडकले जामतुकूम येथील महिलांचे निवेदन स्वीकारल्यानंतर ठाणेदार राजकमल वाघमारे यांनी लगेच पोलिस उपनिरीक्षक धनराज सेलोकर व पोलिस कर्मचाऱ्यांसह जामतुकूममध्ये धडकले. अवैध दारू विक्रेत्यांचा घराची झडती घेतली. यावेळी माजी सरपंच भालचंद बोधलकर व नागरिकांशी ठाणेदारांनी चर्चा केली. अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर