शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

महिलांनी केला दारूमुक्तीचा निर्धार

By admin | Updated: January 31, 2015 01:09 IST

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी श्रमिक एल्गारच्या कार्यकर्त्यांनी दारूबंदी करणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व महाराष्ट्र शासनाचे आभार ...

सावली : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी श्रमिक एल्गारच्या कार्यकर्त्यांनी दारूबंदी करणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व महाराष्ट्र शासनाचे आभार मानत दारूबंदीनंतर दारूमुक्तीसाठी शपथ घेत दारूमुक्तीचा निर्धार केला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूमुक्ती अभियानांतर्गत गत ५ वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची मागणी लावून धरली. दारूबंदी अभियानाची सुरवात करतांना मोझरी येथील तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर महिलांनी दारूबंदीची शपथ घेतली होती. त्यानंतर महिलांचे अनेक लढे झालीत. चिमुर ते नागपूर पदयात्रा, जेल सत्याग्रह, मुंडन आंदोलन करून सरकारचे आंदोलनाकडे लक्ष वेधण्यात आले.निवडणुकीच्या काळात दारूबंदीचे आश्वासन देणारे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना निवडून आणण्यासाठी चंग बांधला. या महिलांच्या लढ्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २० जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा केली. दारूबंदी झाल्यानंतर अवैध दारूविक्री वाढेल, दारूड्यांची संख्या वाढणार अशी शंका व्यक्त केल्या जात आहे. मात्र, दारू मुक्तीसाठीही आम्ही सज्ज आहोत, हे हजारो महीलांच्या संख्येने दिसून आले. सावली येथील ज्योतीबा फुले चौक ते खादी भंडार कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. गांधीजींचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी सभा घेण्यात आली. सभेचे अध्यक्ष गांधीवादी जेष्ठ सामाजीक कार्यकर्त्या लिलाताई चितळे होत्या. अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अवैध मार्गाने दारू पुरवठा होऊ नये, याकरीता महिलांनी, युवकांनी सज्ज असावे, असे आवाहन केले. दारू दुकानदार न्यायालयात जातील. परंतु, महिलांच्या बाजुनेच निर्णय येणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उपस्थित महिलांनी हात पुढे करून दारूमुक्तीचा निर्धार करत नाचत आंनद साजरा केला.माजी न्यायमुर्ती मीरा खडतकर, चित्रा तूर, मंदाताई देसाई, प्रा. विमल गाडेकर, कल्याणी बुटी, हिराताई बावनकर, सरपंच अतुल लेनगुरे, विजय सिध्दावार, ए.आर. दुधे, प्रभाकर गाडेवार, शोभा वाढई, नामपल्लीवार या मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विजय कोरेवार यांनी केले. संचालन किरण शेंडे यांनी तर आभार अनिल मडावी यानी मानले. यावेळी गावातील नागरिकही उपस्थित होते. २२(तालुका प्रतिनिधी)