शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

स्वच्छतेसाठी महिलाही सरसावल्या

By admin | Updated: October 3, 2016 00:50 IST

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.

केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती : रस्त्याच्या दुतर्फा साफसफाईचंद्रपूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याचे औचित्य साधून चंद्रपूर शहरातील महिलांनी हातात झाडू घेऊन मातोश्री विद्यालय ते सुमीत्रनगर या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती केली. या मोहिमेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीरदेखील सहभागी झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत भाजपा महिला आघाडीच्या तुकूम भागातील ३०० महिलांनी स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला. त्यामध्ये श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि वार्डातील नागरिकांनी सहकार्य केले. अभियानाचा समारोप तुकूम येथे करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना शामकुळे, राजेश मुन, भाजप नेते सुभाष कासनगोट्टूवार, अनिल फुलझेले, प्रमोद शास्त्रकार, रवी गुरनुले, अमिन शेख, वसंतराव धंदरे, बबनराव धर्मपुरीवार, वासुदेवराव सादमवार, विवेक कासलीकर आदी उपस्थित होते.प्रमुख अतिथींच्या हस्ते रस्त्याची सफाई करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. अभियानाचे नेतृत्त्व भाजप महिला आघाडीच्या मंजुश्री कासनगोट्टूवार, मायाताई मांदाडे, शिलाताई चव्हाण, प्रज्ञाताई बोरगमवार यांनी केले. स्वच्छता अभियानाची भूमिका मंजुश्री कासनगोट्टूवार यांनी मांडली. यावेळी संचालन कोसे व आभार वंदनाताई संतोषवार यांनी मानले. अभियान यशस्वी करण्यासाठी चंदाताई इटनकर, मोनिषा महावत, सिंधुताई चौधरी, रजनीताई बेसेकर, धर्मपुरीवार, पराये, ज्योती नामेवावर, प्रतिभा रोकडे, प्रविणा धारणे, राणी शेख, माधुरी घागी, वनिता आसूटकर, मेघा हरणे, मनिषा मामीडवार, कासलीकर, स्रेहल चिने, वीणा पाटील, फुलनदेवी देवतळे, सुवर्णा लोखंडे, भारती उपाध्ये, शिल्पा कांबळे, अलका दिकोंडवार आदींसह अनेक महिलांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)रॅलीत अवतरले गांधीजी महिलांच्या स्वच्छता जनजागृती अभियानामध्ये एका वाहनावर गांधीजींची वेशभूषा करून एक चिमुकला बालक उभा होता. त्याच्या सोबत गाडगेबाबा, लोकमान्य टिळक, जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ आदींच्या वेशभूषा करून बालके सहभागी झाली होती. त्यांच्याकडे रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधले जात होते.