शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

अवैध दारुविक्रीच्या विरोधात महिला एकवटल्या

By admin | Updated: November 13, 2015 01:16 IST

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून संपूर्ण दारुबंदी झाली असताना तळोधी (बुु.) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा महापूर वाहत आहे.

तळोधीत ठिय्या आंदोलन : पोलीस चौकीवर काढला मोर्चातळोधी (बा.) : चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून संपूर्ण दारुबंदी झाली असताना तळोधी (बुु.) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा महापूर वाहत आहे. याकडे तळोधी (बा.) पोलीस चौकीचे दुर्लक्ष होत असल्याने खुलेआम दारू विकल्या जात आहे. याविरुद्ध सोमवारी गावातील महिलांनी तळोधीतील पोलीस चौकीसमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. चार दिवसांत अवैध दारू विक्री बंद न झाल्यास आंदोलन तिव्र करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. ठिय्या आंदोलनानंंतर १० नोव्हेंबरला तळोधी ग्रामपंचायतीपासून पोलीस चौकीवर महिला व पुरुषांचा मोर्चाही काढण्यात आला. अवैध दारु व सट्टापट्टी कायमस्वरुपी बंद करण्यात यावी, अशी मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या आवारात सभा पार पडली. या सभेत महिलांनी अवैधरित्या छुप्या मार्गाने पैसा घेवून पोलीस दारू विक्रेत्यांना सोडून देत असल्याचा आरोप केला. यावेळी दारुबंदीसाठी वॉर्डा- वॉर्डात महिला व पुरुषांच्या समित्या स्थापन करा, त्यांना पोलिसांकडून संरक्षण दिल्या जाईल, असे आश्वासन नागभीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवाने व तळोधी (बा,) पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक मस्के यांनी दिले. यावेळी तळोधी (बा.)चे सरपंच राजू रामटेके, उपसरपंच भास्करराव लोनबले, तंटामुक्त अध्यक्ष उपेंद्र चिललवार, वसंत बडवाईक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व पत्रकार मंडळी बहुसंंख्येने हजर होते. (वार्ताहर)