वाढत्या महागाईचा विरोध : अनेक महिलांचा सहभागराजुरा : वाढती महागाई, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या व जिल्ह्यातील पाणी टंचाई आदी समस्यांसाठी राजुरा तालुका महिला काँग्रेसच्या वतीने तहसीलदार धर्मेश फुसाटे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. यात विदर्भातील व राजुरा तालुक्यातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे.मागील दोन-तीन वर्षापासून जिल्ह्यात पाणी टंचाईला सर्वसामान्य नागरिकांना समोर जावे लागत आहे. पाणी टंचाई स्थिती बघता जे वाटर रेन हार्वेस्टिंग परिपत्रक शासनाने काढले आहे. त्याची पुर्णपणे अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे दिसते. जिल्ह्यावर यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती आलेली असताना अशा परिस्थितीत पाणी अडवा पाणी जिरवा या अभियानाला व्यापक स्वरूप देऊन योजना प्रभावीपणे राबविण्यात येणे गरजेचे आहे.जिल्ह्यात सरकारी पर्जन्यमान १०४० मी. मीटर आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून अत्यल्प पाऊस पडत आहे. त्यानंतर सर्वात जास्त शेतकऱ्यांना फटका बसत आहे. धानपट्टयात तर जास्तच चिंताजनक परिस्थिती आहे. धरणाचे पाणी तातडीने सोडण्याची व्यवस्था करण्यात यावी, रोजच्या जीवन उपयोगी वस्तुचे भाव गगनाला भिडलेले असून घरात उपयोगी डाळ, तांदूळ, हळद साऱ्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. ही भाववाढ त्वरित कमी करण्यात यावी, अशा अनेक मागण्या या निवेदनातून राजुरा तालुका महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या आहेत.यावेळी राजुरा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा माया पाकमोडे, कॉग्रेस कार्यकर्त्या सुरेखा चिडे, राजुरा नगरपालिकेच्या अध्यक्ष मंगला आत्राम, पंचायत समिती सभापती निर्मला कुडमेथे, पुष्पा उईके, ज्योची ठावरी, कविता उपरे, आशा लांडे, ज्योती झाडे, माधुरी भोंगळे, कुंदा जेनेकर, यमुनाबाई तलांडे, विठाबाई माडवी यांच्यासह अनेक कॉग्रेस महिला कार्यक्रर्त्याची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
महिला काँग्रेसतर्फे विविध समस्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By admin | Updated: June 25, 2016 00:46 IST