आॅनलाईन लोकमतभद्रावती : महिला सफाई कामगार, दारिद्र्य रेषेखालील महिला बचतगट, आॅटोरिक्षा चालविणाऱ्या महिलांचा न.प.द्वारे सत्कार करण्यात आला, हा सत्कार म्हणजे आतापर्यंत माझ्या जीवनात पाहिलेला सर्वात हृदयस्पर्शी सत्कार होता. या प्रसंगामुळे भारावून गेले. आम्ही केवळ चित्रपटातील नायिका आहोत. समाजातल्या खऱ्या नायिका या सत्कारमुर्ती महिला आहेत, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री अल्का कुबल यांनी महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.महिला व बालकल्याण समिती, दिअयो-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषदद्वारा जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व स्वच्छ भारत अभियानांतर्गत उत्कृष्ठ कार्य करणाºया महिलांचा सत्कार हुतात्मा स्मारक प्रांगणात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार बाळू धानोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी विनोद जाधव, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, प्रा. सचिन सरपटवार, सामाजिक कार्यकर्त्या वनिता घुमे, प्रतिभा धानोरकर व नगरसेवक, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. कुबल म्हणाल्या, स्त्रियांच्या यशामागे कुटुंब असते. सासु-सासरे पाठीशी होते. म्हणूनच मी चित्रपटात कार्य करू शकले. आई-वडिलांची जागा वृद्धाश्रमात नाही. तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयात असली पाहिजे. त्यांनीच तुम्हाला संस्कार शिकविले. तुम्ही आपले सर्वस्व वाहून दिले तरच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार प्राप्त उन्नती महिला बचत गट, सफाई महिला कामगार, रिक्षा चालक महिला, विविध महिला बचतगटांचा अल्का कुबल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी जि. प. च्या महिला व बालकल्याण समिती सभापती मीनल आत्राम, सभापती माया नारळे, उपसभापती सीमा पवार, शहर अभियान व्यवस्थापक ज्योती लालसरे, रफीक शेख, सुरेखा आस्वले, नगरसेविका रेखा कुटेमाटे, माधुरी कळमकर, शारदा ठवसे, शोभा सातपुते, शुभांगी उमरे, आशा निंबाळकर, राखी रामटेके, नालंदा पाझारे, सोनिया कामटकर, अर्चना आरेकर, अल्का सातपुते उपस्थित होते. प्रास्ताविक नगराध्यक्ष अनिल धानोरकर तर संचालन सारिका धानोरकर यांनी केले. शेख यांनी आभार मानले.
महिलाच समाजातील खऱ्या नायिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:10 IST
महिला सफाई कामगार, दारिद्र्य रेषेखालील महिला बचतगट, आॅटोरिक्षा चालविणाऱ्या महिलांचा न.प.द्वारे सत्कार करण्यात आला, हा सत्कार म्हणजे आतापर्यंत माझ्या जीवनात पाहिलेला सर्वात हृदयस्पर्शी सत्कार होता.
महिलाच समाजातील खऱ्या नायिका
ठळक मुद्देअल्का कुबल : महिला मेळावा