शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
4
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
5
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
6
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
7
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
8
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
9
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
11
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
12
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
13
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
14
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
15
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
16
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
17
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
18
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
19
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
20
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

विविध उद्योगातून महिला होत आहेत आत्मनिर्भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आणि बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांच्या माध्यमातून टूथपिक उत्पादन केंद्र पोंभूर्णा येथे कार्यान्वित झाले. या माध्यमातून पोंभूर्णा तालुक्यातील महिला व पुरुषांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पोंभूर्णा या आदिवासीबहुल तालुक्यातील हे टूथपिक उत्पादन म्हणजे एक कोटी रुपये निधी खर्चून रोजगार निर्मितीचे दालन उभारले आहे.

ठळक मुद्देपोंभूर्णा येथे टूथपिक उद्योगात गुंतल्या महिल्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वयंरोजगार व महिला बकटीकरणासाठी जिल्ह्यात मागील काही वर्षात जोरदार प्रयत्न झाले. मागणी तसा पुरवठा या धोरणातून पोंभूर्णा येथे टूथपिक प्रकल्प याच अनुषंगाने सुरू करण्यात आला. या प्रकल्पातून महिलांना रोजगार मिळत असून त्यातून त्या आत्मनिर्भर होत आहेत. याबाबत महिलांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.लोकमतशी बोलताना त्या म्हणाल्या आजपर्यंत टूथपिक तायवानहून आयात व्हायची, पण आता आमा नंतर थेट चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभर्णा येथे टूथपिकचे उत्पादन होणार आहे. पोंभूर्णा येथे तयार होणाऱ्या टूथपिक या पुढील काळात आपण पंचतारांकित हॉटेल्सला पुरविणार आहोत. आदिवासीबहुल असलेल्या पोंभूर्णा तालुक्यात टूथपिक उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे नवे प्रशस्त दालन उपलब्ध झाले आहे. महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आणि बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांच्या माध्यमातून टूथपिक उत्पादन केंद्र पोंभूर्णा येथे कार्यान्वित झाले. या माध्यमातून पोंभूर्णा तालुक्यातील महिला व पुरुषांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पोंभूर्णा या आदिवासीबहुल तालुक्यातील हे टूथपिक उत्पादन म्हणजे एक कोटी रुपये निधी खर्चून रोजगार निर्मितीचे दालन उभारले आहे. या प्रकल्पामुळे महिलांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली. यातून त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.आदिवासी महिलांची पहिली कंपनीपोंभूर्णा महिला पोल्ट्री प्रोड्युसर्स कंपनी लिमिटेड या नावाने चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी महिलांची पहिली कंपनी थाटण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात स्थापन करण्यात आलेली पोंभूर्णा महिला पोल्ट्री प्रोड्युसर्स कंपनी ही राज्यातील आदिवासी महिलांच्या मालकीची पहिलीच कंपनी आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मूल, पोंभूर्णा व गोंडपिपरी या तालुक्यांसाठी एक हजार आदिवासी महिलांकरिता कुक्कुटपालनाचा हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पोंभूर्णा तालुक्यातील ३४५ महिलांना कुक्कुट शेड उपलब्ध करण्यात आले असून बॉयलर कोंबडीचे पिल्लेसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भारत सरकारच्या कार्पोरेट कार्य मंत्रालयातर्फे पोंभूर्णा महिला पोल्ट्री प्रोड्युसर्स कंपनी लिमिटेड या कंपनीला प्रमाणपत्रसुद्धा प्रदान केले आहे. सदर कंपनीच्या माध्यमातून कुक्कुटपालनाचा हा महत्त्वाकाक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आदिवासीबहुल पोंभूर्णा तालुक्यात महिलांना आत्मनिर्भर करीत रोजगार देणारा हा प्रकल्प निश्चितच राज्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.असेच उद्योग येत रहावेमागील पाच वर्षात बेरोजगारी दूर करण्यासाठी शासनाकडून बºयापैकी प्रयत्न झाला. मोठे उद्योग आले नसले छोट्या छोट्या उद्योगांची उभारणी करून अनेकांना रोजगार मिळाला. बांबूपासून विविध वस्तू तयार करणे, टूथपिक, महिलांनी पोल्ट्री कंपनी यासारख्या छोटेखानी उद्योगातून महिलांचे सबळीकरण होत आहे. यासारखेच आणखी छोटे छोटे उद्योग जिल्ह्यात सुरू झाले तर प्रत्येकाच्या हाताला काम मिळू शकणार आहे.स्वयंरोजगार व महिला बकटीकरणासाठी जिल्ह्यात अनेक नाविण्यपूर्ण योजना सुरू केल्या. कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला. महिलांच्या आर्थिक विकासामुळे एकूणच कुटुुंबातील जीवनोन्नतीचा दर्जा बदलतो. यशस्वी अंमलबजावणीमुळे महिला आता आत्मनिर्भर होऊन विकासाच्या प्रवाहात येत आहेत. ही जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धीच आहे.-सुधीर मुनगंटीवार,वित्त, नियोजन, वने तथा पालकमंत्री, चंद्रपूर

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार