शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात विवस्त्र करून महिलेस जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:38 IST

क्षुल्लक कारणावरून एका विवाहित महिलेला भर रस्त्यावर विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे, या मारहाणीत सदर महिला बेशुध्द पडली असता तिच्या अंगावर पाणी टाकून पुन्हा मारहाण करण्यात आली. ही संतापजनक घटना २७ मे रोजी मूल तालुक्यातील येरगाव येथे घडली.

ठळक मुद्देआरोपींच्या दहशतीमुळे ग्रामस्थ होते गप्पघटना सात दिवसानंतर उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : क्षुल्लक कारणावरून एका विवाहित महिलेला भर रस्त्यावर विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे, या मारहाणीत सदर महिला बेशुध्द पडली असता तिच्या अंगावर पाणी टाकून पुन्हा मारहाण करण्यात आली. ही संतापजनक घटना २७ मे रोजी मूल तालुक्यातील येरगाव येथे घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आधी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र श्रमिक एल्गार संघटनेने ही घटना उघडकीस आणून पोलिसांना रविवारी दखलपात्र गुन्ह्याची नोंद करायला भाग पाडले.पीडित महिलेचा नवरा वेडसर असून, आपल्या पत्नीला वाचविण्यासाठी त्याने पोलीस पाटलांकडे त्यांनी धाव घेतली असता, त्यालाही जबर मारहाण करण्यात आली होती. पीडित महिलेवर चंद्रपुरात खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.येरगाव येथील प्रभाकर नागापुरे यांची पत्नी कुसूम हिच्यासोबत पीडित महिलेचे घरगुती कारणावरून २७ मे रोजी भांडण झाले. या भांडणावरून चिडलेल्या प्रभाकरने आपला पुतण्या नवनाथ याला बोलावून पीडितेच्या घरात दरवाजा तोडला व आत शिरले. तेथूनच तिला विवस्त्र करीत रस्त्यावर आणले आणि हातात असलेल्या बैलबंडीच्या उभारीने तिला बेदम मारहाण केली. नागरिक त्या ठिकाणी जमले. मात्र आरोपीने सर्वांना मध्ये आला तर जिवानीशी मारण्याची धमकी दिली. भर उन्हात बेदम मारहाणीने ही महिला बेशुध्द पडली असता, परत आरोपींनी तिच्या अंगावर पाणी टाकून मारणे सुरू केले. या घटनेची माहिती पीडितेच्या पतीने गावच्या पोलीस पाटलांना दिली. त्यांनी याबाबत मूल पोलिसांना कळवून, नंतर पोलिसांच्या गाडीने पीडितेला मूल पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून पीडितेला घरी परत पाठविले.गावात आरोपींची एवढी दहशत होती की कुणीही या घटनेवर बोलायला तयार नव्हते. या गंभीर घटनेची माहिती श्रमिक एल्गारच्या अध्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांना समजताच, त्यांनी गावात जावून सत्य परिस्थितीची माहिती घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून या घटनेची माहिती पोलीस अधिक्षक नियती ठाकर यांना देत, मूल पोलीस स्टेशनमध्ये जावून आरोपीवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रभाकर बंडू नागापूरे, नवनाथ सुधाकर नागापूरे, कुसूम प्रभाकर नागापूरे यांच्या विरोधात अपराध क्रमांक ६१६/१८ कलम ३५४ (इ), ४५२, ३२४, ५०६, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा