शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात‍ ॲक्टीव्ह रुग्ण तीन हजारांच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST

रविवारी चंद्रपूर शहर व परिसरातील बिनबा वार्ड, सिव्हील लाईन, घुग्घुस, स्नेह नगर, ऊर्जानगर, तुकुम, नगिनाबाग, घुटकाळा वार्ड, बालाजी वार्ड, लालपेठ कॉलरी, दाद महल वार्ड, आकाशवाणी रोड परिसर, जीएमसी परिसर, महाकाली वार्ड, इंदिरानगर, बाबुपेठ, केरला कॉलनी परिसर, रामनगर, भिवापूर वॉर्ड, विवेक नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ठळक मुद्देनवे बाधित १७३ : आतापर्यत १०,२७६ बाधित कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनातून मुक्त होत असलेल्यांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत १० हजार २७६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान रविवारी नव्याने १७३ बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता १३ हजार ४०० वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन हजार ९२५ अ‍क्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.रविवारी चंद्रपूर शहर व परिसरातील बिनबा वार्ड, सिव्हील लाईन, घुग्घुस, स्नेह नगर, ऊर्जानगर, तुकुम, नगिनाबाग, घुटकाळा वार्ड, बालाजी वार्ड, लालपेठ कॉलरी, दाद महल वार्ड, आकाशवाणी रोड परिसर, जीएमसी परिसर, महाकाली वार्ड, इंदिरानगर, बाबुपेठ, केरला कॉलनी परिसर, रामनगर, भिवापूर वॉर्ड, विवेक नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.यासोबतच बल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्ड, राणी लक्ष्मीबाई वार्ड, विसापूर, पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा, शिवाजी चौक, बोर्डा झुल्लुरवार, सिंदेवाही तालुक्यातील शिवनी, नवरगाव, गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापुर, करंजी, नवीन बस स्टॅन्ड, राजुरा तालुक्यातील विहिरगाव, वार्ड नंबर ४, मुल तालुक्यातील वार्ड नंबर चार, वार्ड नंबर १६, चिरोली, मारोडा, गडीसुर्ला, नांदगाव, भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगर, सुरक्षा नगर, सुमठाणा, नागभीड तालुक्यातील तळोदी, पार्डी, नवीन बस स्टॅन्ड परिसर, सुलेझरी वार्ड नंबर ८ परिसर, कोजाबी माल, बाळापुर, सावरगाव, पळसगाव, वरोरा तालुक्यातील एमएसईबी कॉलनी परिसर, चैतन्य नगर बोर्डा, कोरपना तालुक्यातील गडचांदूर, उपरवाही व ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधीनगर, बाळापूर पेठ वार्ड, टिळक नगर परिसरातून बाधित रविवारी पुढे आले आहेत. बाधितांचा आलेख कधी कमी तर कधी जास्त होत असल्याने सतर्क राहण्याची गरज आहे.दोन बाधितांचा मृत्यूजिल्ह्यात रविवारी दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये मुंगोली, वणी यवतमाळ येथील ५० वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला १० आॅक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. तर, दुसरा मृत्यू शिवाजी चौक परिसर, पोंभुर्णा येथील ६५ वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला १६ आॅक्टोबरला डॉ.पंत हॉस्पीटल,चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते. दोन्ही बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार होता. जिल्ह्यात आतापर्यंत १९९ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १८८ बाधितांचा समावेश आहे.तालुकानिहाय नव्या बाधितांची संख्याजिल्ह्यात रविवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ५६, बल्लारपूर तालुक्यातील पाच, पोंभूर्णा तालुक्यातील तीन, चिमूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील ११, ब्रह्मपुरी तालुक्यातील १७, नागभीड तालुक्यातील १२, वरोरा तालुक्यातील पाच, भद्रावती तालुक्यातील १३, सिंदेवाही तालुक्यातील २१, राजुरा तालुक्यातील पाच, गोंडपिपरी तालुक्यातील चार, कोरपना तालुक्यातील १५, गडचिरोली व यवतमाळ येथील प्रत्येकी एक असे एकूण १७३ बाधित पुढे आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या