शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वाईनशॉप मालकाने ग्राहकाच्या डोक्यावर फोडली दारूची बाटली; गुन्हा दाखल

By राजेश भोजेकर | Updated: March 15, 2023 12:08 IST

चंद्रपुरातील आनंद वाईन्सचे संदिप अडवाणीला अटक 

चंद्रपूर : दारु दुकानदार आणि ग्राहक ह्यांच्यातील वाद नवे नाहीत. दारू दुकानदाराचा संताप अनावर होऊन त्याने चक्क ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून ग्राहकाला गंभीर जखमी केल्याची घटना चंद्रपूर येथिल जटपुरा गेटजवळ असलेल्या आनंद वाइन शॉप येथे घडली. दुकानाचे संचालक संदिप अडवाणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, शहरातील जटपुरालगत असलेल्या आनंद वाइन शॉपचे मालक चंद्रकांत अडवाणी यांचा मुलगा संदीप अडवाणी याने किरकोळ वादातून एका ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडली. त्यात तरुण ग्राहक गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याप्रकरणी संदीप अडवाणी याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजता घडली.

शहरातील अत्यंत गजबजलेल्या मार्गालगत हे दारूचे दुकान असुन मद्यापींची येथे कायम गर्दी असते. देशी तसेच विदेशी दारू शौकिन वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर जटपुरा गेटलगत चंद्रकांत अडवाणी या दारू व्यावसायिकाने आनंद वाइनशॉप सुरू केले. या वाइन शॉपमुळे रस्त्यावर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सायंकाळी या मार्गावरून महिलांना ये-जा करताना बेवड्यांचा मनस्ताप सहन करावा लागतो.

मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान एक ग्राहक वाइन शॉपमध्ये गेला असता शुल्लक कारणावरून भांडण झाले. वाद विकोपाला गेला काउंटरवर बसून असलेला चंद्रकांत अडवाणीचा मुलगा संदीपने ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बॉटल त्यामुळे तरूण रक्तबंबाळ झाला. या घटनेने रस्त्यावर बराच वेळ वाहतुकीचाही खोळंबा निर्माण झाला होता. या मारहाणप्रकरणी तरुणाच्या तक्रारीनंतर संदीप अडवाणीला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर