शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी वन्यप्राणी-मानव संघर्ष

By admin | Updated: May 11, 2014 23:27 IST

जंगलव्याप्त चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा वगळता उर्वरीत भागात जंगल विरळ आहे. विरळ जंगलातील नैसर्गिक पाण्याचे साठे फेब्रुवारी महिन्यापासून आटायला लागतात.

चंद्रपूर : जंगलव्याप्त चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा वगळता उर्वरीत भागात जंगल विरळ आहे. विरळ जंगलातील नैसर्गिक पाण्याचे साठे फेब्रुवारी महिन्यापासून आटायला लागतात. पानवठ्याचीही अशीच काहीशी स्थिती असते. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाच्या दिशेने येत असतात. यातून वन्यप्राणी हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गावाला लागून असलेले तलाव, नाल्याच्या परिसरात ठाण मांडून बसतात. गावकरी इंधनासाठी वृक्षतोड करतात. त्यांच्यासोबतच तस्करांनीही जंगलावर हात साफ करणे सुरू केले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात गावाशेजारीत जंगल सपाट झाले आहे. जंंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाल्याने तृणभक्षी प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे हिंस्त्र प्राणी गेल्या काही वर्षांपासून गावात येत आहेत. गावातील सर्व घाण गावाबाहेर फेकली जाते. बाहेरच अनेकजण शौचास बसतात. या कचर्‍याच्या परिसरात कुत्र्याचा वावर असतो. कुत्रे आणि माकड बिबट्याचे सर्वात आवडते खाद्य आहे. माकडे हाती लागत नाही. मात्र कुत्रे सहज मिळतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाणी आणि शिकारीच्या शोधात बिबटे गावाशेजारी येऊ लागले आहेत. अशुद्ध वातावरणासोबतच जंगलात लावण्यात येणार्‍या आगीच्या घटनांमुळे वन्यप्राण्यांचे रस्तेच बदलत चालले आहेत. आगीच्या भितीपोटी बिबटे, वाघ, गावात येतात. पाण्याचे स्त्रोतही आटायला लागतात. त्यामुळे पाणी आणि भक्ष्याच्या शोधात वन्यप्राणी भटकत असतात. या भटकणार्‍या कालावधीत त्यांची गाठ कित्येकदा मानवासोबत पडते. उन्हाळ्याच्या दिवसात मोहफुल संकलनासाठी जाणार्‍यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पावसाळ्यात पाळीव प्राण्यांवर वन्यप्राण्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. मानव वन्यजीव संघर्षात महत्वाचा प्राणी बिबट्या आहे. बिबट्या कुठल्याही परिस्थितीत स्वत:ला जुळवून घेतो. अगदी मानवी वसाहतीलगत असलेल्या जंगलसदृश अधिवासात तो राहतो. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे व डुकरे आहेत. ज्या जंगलव्याप्त गावालगत अस्वच्छता, घाण व उरीकडे असेल तिथे या प्राण्याची संख्या अधिक असते. (शहर प्रतिनिधी)