शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोंभूर्णा झाले ‘वायफाय’ शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:11 IST

कोणताही देश किती धनसंपन्न आहे यापेक्षा तो किती ज्ञानसंपन्न आहे, यावर त्या देशाच्या प्रगतीचे मुल्यमापन केले जाते. त्यामुळे पोंभुर्णा शहरात जनतेच्या सेवेत रुजु होणाऱ्या वायफाय सुविधेचा उपयोग चांगल्या वेबसाईट्स बघत ज्ञानवर्धन करण्यासाठी करावा, असे आवाहन राज्याचे वित्त,.....

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : ‘वायफाय’ सुविधेचा सदुपयोग करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोणताही देश किती धनसंपन्न आहे यापेक्षा तो किती ज्ञानसंपन्न आहे, यावर त्या देशाच्या प्रगतीचे मुल्यमापन केले जाते. त्यामुळे पोंभुर्णा शहरात जनतेच्या सेवेत रुजु होणाऱ्या वायफाय सुविधेचा उपयोग चांगल्या वेबसाईट्स बघत ज्ञानवर्धन करण्यासाठी करावा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभुर्णा शहर आणि तालुक्याच्या विकासाची प्रक्रिया यापेक्षाही अधिक गतिमान करण्यासाठी मला आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.पोंभुर्णा शहरात नवीन बस स्थानक बांधकामाचा भूमीपूजन सोहळा तसेच वायफाय सुविधेचे लोकार्पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, नगराध्यक्ष श्वेता बनकर, उपाध्यक्ष रजिया कुरैशी, पंचायत समितीचे उपसभापती विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य ज्योती बुरांडे, गंगाधर मडावी, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विपिन मुद्दा, तहसिलदार अशोक तरोडे, राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक राहुल मोडक, वास्तु विशारद किशोर चिद्दलवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी बोलताना ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, पोंभुर्णा शहर व तालुक्यातील नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने सर्व सोयींनी युक्त असे बसस्थानक निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांनी माझ्याकडे केली. ज्या तालुक्यातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्या नागरिकांची मागणी मी प्राधान्याने पूर्ण केली व आज बसस्थानकाच्या बांधकामाचे भूमीपूजन करताना अतिशय आनंद होत आहे. एस.टी. महामंडळाला ७०० नवीन बसेस खरेदीसाठी जेव्हा मी मान्यता दिली. त्यावेळी त्यांना दोनशे बसेस चंद्रपूर जिल्ह्यासाठी देण्याबाबत सूचना मी दिल्या. पोंभुर्णा शहर व तालुक्यात विविध विकास कामे आम्ही पूर्णत्वास नेली आहेत. शहरात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय लवकरच जनतेच्या सेवेत रूजु होत आहे. स्मशानभूमी, कब्रस्तान, आठवडी बाजार यांची कामे प्रगतिपथावर आहेत. तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुध्दा लवकरच सुरू होणार असून इतरही विकासकामे प्राधान्याने पूर्णत्वास येत आहेत. बिव्हीजीच्या मदतीने पाच हजार एकरवर शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचे प्रस्तावित असून यासाठी विख्यात उद्योजक रतन टाटा यांचा मी आभारी आहे.रोजगार, शिक्षण, आरोग्य, कृषी विकास, रस्ते विकास, पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था या सर्वच घटकांवर विशेष लक्ष्य केंद्रीत करून पोंभुर्णा शहर व तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.यावेळी नविन बसस्थानक बांधकामाचे भूमीपूजन तसेच वायफाय सुविधेचे लोकार्पण वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक शंभरकर यांनी केले.घोंगडी क्लस्टरला मान्यतापोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी महिलांसाठी कुक्कटपालन योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या असून घोंगडी क्लस्टरला मान्यता दिली आहे, अशी माहितीही यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

टॅग्स :WiFiवायफायSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार