शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

पतीच्या काठीहल्ल्यामुळे पत्नी वाघाच्या तावडीतून सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 1:37 PM

Chandrapur News कोठारी वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्रातील हरणपायली बीट क्र. ५४१ लगत असलेल्या शेतात तूर पिकाचे रक्षण तथा जागल करण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला चढविला.

ठळक मुद्देपतीच्या समयसूचकतेने महिलेचा जीव वाचला

लोकमत न्यूज नेटवर्क   चंद्रपूर : कोठारी वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्रातील हरणपायली बीट क्र. ५४१ लगत असलेल्या शेतात तूर पिकाचे रक्षण तथा जागल करण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला चढविला. काही अंतरावरच असलेल्या तिच्या पतीने वाघाच्या दिशेने पूर्ण ताकदीनिशी काठी भिरकावली. काठी बसताच वाघ पतीच्या मागे लागला. मात्र समयसूचकता दाखवत पती झाडावर चढला व आरडाओरड सुरू केली. त्यामुळे वाघ जंगलाच्या दिशेने पळाला.

ही थरारक घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली. कोठारी परिसरातील स्थानिक वनक्षेत्रात येणाऱ्या हरणपायली बीटातील नियत क्षेत्रालगत असलेल्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर तूर पिकाच्या राखणीसाठी कोठारी येथील करणकुमार कन्नाके व त्यांच्या पत्नी लीला करणकुमार कन्नाके सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान शेतात गेले होते. रात्री १० वाजताच्या दरम्यान लीला कन्नाके या झोपडीपासून काही अंतरावर गेल्या असता शेतालगतच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला.

आधीच सावध असलेल्या महिलेने किंचाळण्यास सुरुवात केली. त्या आवाजाच्या दिशेने पती करणकुमार यांनी धाव घेतली. पत्नीच्या जवळ वाघ दिसताच त्याने जवळ असलेली काठी वाघाच्या दिशेने ताकदीने भिरकाविली आणि वाघावर काठीचा प्रहार होताच वाघ करणकुमारवर हल्ला करण्यासाठी धावला. त्याच वेळी करणकुमार झाडावर चढला व मोठ्याने आरडाओरड करू लागला. यामुळे वाघ जंगलात पसार झाला.

यात लीला कन्नाके या जखमी झाल्या असून, त्यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती तात्काळ कोठारी वनाधिकारी यांना देण्यात आली. पतीच्या समयसूचकतेमुळे पत्नीचे प्राण वाचले. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे सावट पसरले आहे.

टॅग्स :Tigerवाघ