लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एलईडी दिवे लावण्यासाठी राज्य शासनाने ईएसएनएल कंपनीसोबत सात वर्षांचा करार केला आहे. या कंपनीने चंद्रपूरात ११ हजार दिवे लावले. हे दिवे निकृष्ट दर्जाचे आहे. परिणामी ७०० दिवे बंद पडले. मात्र ही कंपनी मनपाचे ऐकूण घेत नसल्याने मनपाने नव्याने १८ हजार दिले लावण्यासाठी दिवा देखभाल दुरुस्तीच्या नावावर तीन टेंडर काढल्याचा आरोप काँग्रेसचे उपगटनेते अ. विजय वडेट्टीवार यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषेदत केला.ईएसएनएल श्हरात एलईडी दिवे लावून मोकळी झाली. काही दिवसांतच बंद पडेलल्या दिव्यांची दुरुस्तीही त्यांनाच करायची आहे. मात्र ही कंपनी मनपाला जुमानत असल्याचा आरोपही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केला. या कंपनीने काढलेल्या जुन्या दिव्यांचा कुठेही हिशेब नसल्याने यात घोळ झाल्याचा संशयही त्यांनी वर्तविला. यावेळी प्रकाश देवतळे, नंदु नागरकर, मनोहर पाऊणकर, महेश मेंढे, सुनिता लोढीया, दिनेश चोखारे, विनायक बांगडे, घनश्याम मुलचंदानी, सुनिता अग्रवाल, शिवा राव, हरीश कोतावार उपस्थित होते.राफेल घोटाळा जनतेपर्यंत पोहोचविणारराफेल खरेदीत देशात आजवरचा सर्वात मोठा घोटाळा झालेला आहे. या घोटाळ्यामुळे ४१ हजार २०४ हजार कोटींने जनतेची लुट आहे. राफेल खरेदी नेमकी कितीमध्ये झाली हे मोदी सरकार लपवून ठेवत आहे. काँग्रेसच्या काळात राफेल खरेदीच्या सौद्यावर संशय येताच तत्कालिन पंतप्रधानांनी ही खरेदी स्थगित केली होती. मात्र मोदी सरकारने सर्व नियम धाब्यावर ठेवून १६७०.७० लक्ष रुपये प्रति विमान खरेदी केली. या करारात हिंदूस्थान एरोनॉटीकल लि. या अनुभवी कंपनीला बाजुला केले. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने तो जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम काँग्रेस आंदोलनाच्या माध्यमातून करणार असल्याची माहितीही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.
दिवा देखभाल दुरुस्ती टेंडर कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:53 IST
एलईडी दिवे लावण्यासाठी राज्य शासनाने ईएसएनएल कंपनीसोबत सात वर्षांचा करार केला आहे. या कंपनीने चंद्रपूरात ११ हजार दिवे लावले. हे दिवे निकृष्ट दर्जाचे आहे. परिणामी ७०० दिवे बंद पडले. मात्र ही कंपनी मनपाचे ऐकूण घेत नसल्याने मनपाने नव्याने १८ हजार दिले लावण्यासाठी दिवा देखभाल दुरुस्तीच्या नावावर तीन टेंडर काढल्याचा आरोप काँग्रेसचे उपगटनेते अ. विजय वडेट्टीवार यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषेदत केला.
दिवा देखभाल दुरुस्ती टेंडर कशासाठी?
ठळक मुद्देविजय वडेट्टीवारांचा मनपाला सवाल : ईएसएनएलने लावलेले दिवे निकृष्ट