शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

२४६० शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून विमा कंपनीने का केले अपात्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:03 IST

बल्लारपूर तालुक्यातील प्रकार : शेतकरी विम्यापासून वंचित

आशिष खाडेलोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव: प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये बल्लारपूर तालुक्यातील ६७५४ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा काढला. मात्र, त्यात फक्त पीक नुकसानीचा २८५६ शेतकऱ्यांना पीकविमा प्राप्त झाला. २४६० विमा काढलेले शेतकरी पात्र असूनदेखील त्यांना विमा कंपनीने विविध कारणे दाखवून अपात्र केल्याचा प्रकार बल्लारपूर तालुक्यात उघडकीस आला आहे.

बल्लारपूर तालुक्यातील १७ गावांमधील ६७५४ शेतकऱ्यांनी एका रुपयात पीकविमा काढला. २०२३ मध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यात कापूस, सोयाबीन, तूर, धान, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ना झाले होते. शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या नियमानुसार ७२ तासांच्या आत क्लेम केली. त्यापैकी नुकसानभरपाई म्हणून २८५६ शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे खात्यावर जमा करण्यात आले. तर २४६० कापूस, धान उत्पादक पात्र शेतकऱ्यांना विमा कंपनीने आपले स्वतःची विविध कारणे उपस्थित करून त्या सर्व शेतकऱ्यांचे क्लेम अपात्र करण्यात आलेले आहेत.

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान अतोनात होऊनदेखील विमा कंपनीच्या मनमर्जी कारभारामुळे त्या २४६० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून. पीकविमा कंपनीचे तांत्रिक प्रॉब्लेम, वेळेवर शेतावर पंचनामा करण्यासाठी न येणे, अचूक करणे दाखवणे, टोल फ्री नंबरवर तक्रार न घेणे, या कारणांमुळे त्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे विमा कंपनीने अपात्र केल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे.

शासनाने मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना आणली खरी; मात्र ती शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरली आहे. आता शेतकऱ्यांना विमा काढून पीक नुकसानीपोटी पात्र असून देखील अपात्र करण्याचा सपाटा विमा कंपनी केला असल्याने या शेतकऱ्यांकडे थेट कृषिमंत्र्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन विमा कंपनीचे कान टोचण्याची गरज आहे.

पालकमंत्र्यांनी बैठक घेण्याची गरजबल्लारपूर तालुक्यातील २४६० शेतकरी विमा लाभ मिळण्यासाठी पात्र असून देखील विमा कंपनीने त्या शेतकऱ्यांना विविध मनमर्जीने कारणे दाखवून अपात्र केले. त्यामुळे संकटकाळात शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी राहणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकारी व विमा प्रतिनिधी यांची बैठक घेऊन बल्लारपूर तालुक्यातील अपात्र केलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा व यानंतर समोर नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे क्लेम विमा प्रतिनिधी अपात्र करणार नाही, अशी पारदर्शकता आणावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जिल्हा विमा अधिकारी यांना शेतकऱ्यांनी फोन केल्यास समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप देखील शेतकरी करत आहे.

"शेतकऱ्यांना विमा कंपनीने किरकोळ कारणे देत विमा नाकारला आहे; परंतु व्यवहारिकदृष्ट्या विचार केला तर हे शेतकरी नुकसान भरपाईस पात्र आहे." - श्रीधर चव्हाण, कृषी अधिकारी, बल्लारपूर 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाCropपीकfarmingशेतीchandrapur-acचंद्रपूर