शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक गणेश मंडळांना कोणाची परवानगी आवश्यक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 12:59 IST

गणेशोत्सव तयारी सुरू : मंडप बांधकामाला झाली सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : श्रावण महिन्यापासून विविध सणांना प्रारंभ होतो. ऑगस्टमधील ५ तारखेपासून श्रावण महिन्याला प्रारंभ झाला असून, सप्टेंबर महिन्याच्या ७ तारखेला गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे.

गणेशोत्सवाला ९ दिवसांचा कालावधी असला तरी मागील एक ते दीड महिन्यापासून भव्यदिव्य मंडप, आकर्षक देखावे सादर करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप बांधकामाला सुरुवात झाली आहे. अशावेळी गणेश मंडप टाकण्यापासून अनेक प्रकारची परवानगी घेण्यासाठी मंडळांकडून तयारी केली जाते. शहराला गणेशोत्सवाची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे.

यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांकडून हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या उत्सवाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. तर मूर्तिकारसुद्धा गणरायाच्या मूर्ती साकारण्यासाठी दिवसरात्र एक करून काम करताना दिसत आहेत. यावर्षी गणेशोत्सवासाठी महापालिकेनेही तयारी सुरु केली आहे. चांदा क्लब ग्राऊंडवर गणेशमूर्ती विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

परवानगीसाठी अर्ज कसा कोठे कराल? सार्वजनिक गणेश मंडळांना महापालिका तसेच अन्य विभागांची परवानगी घेणे गरजेचे असते. यासाठी विविध विभागांकडे अर्ज करावा लागतो. यामध्ये पोलिस, महापालिका, वीज मंडळ, अग्निशमन विभाग, धर्मादाय आयुक्तांकडे विविध परवानगीसाठी अर्ज करावा लागतो. सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना त्रास होऊ नये. त्यांना एका ठिकाणीच सर्वच परवानगी मिळाली यासाठी महापालिकेना एक खिडकी योजना सुरू केली आहे.

कागदपत्रे काय लागतात? परवानगीसाठी ऑनलाइन, ऑफलाइन अर्ज करता येतो. यासाठी सार्वजनिक गणेश मंडळाचे नाव, अध्यक्ष व कार्यकारिणीचा उल्लेख करावा लागतो, ज्या ठिकाणी मंडप टाकायचा आहे त्या जागेचा उल्लेख करणे गरजेचे आहे. धर्मादाय कार्यालयाची परवानगीही महत्त्वाची आहे.

विजेसाठी सवलत 

  • महावितरणकडून दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळांना मागणीनुसार वीजपुरवठा करतात. 
  • अनेकवेळा सवलतीच्या दरात वीजजोडणी करून दिली जाते. त्यासाठी अर्ज करावा लागतो.

मंडप टाकण्यासाठी यांची परवानगी आवश्यक 

  • पोलिस : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे भव्यदिव्य कार्यक्रम राहतात. त्या ठिकाणी भाविकांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी पोलिस प्रशासनाची परवानगी घेणे गरजेची आहे. 
  • महापालिका : रस्त्यात किंवा सार्वजनिक खुल्या भूखंडाच्या ठिकाणी मंडप उभारण्यासाठी गणेश मंडळांना महापालिकेची परवानगी बंधनकारक आहे.
टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवchandrapur-acचंद्रपूर