शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

तर टोलविरोधात आंदोलन उभारणार

By admin | Updated: January 13, 2015 22:57 IST

पथकरासंदर्भात असलेल्या नियमांना पायदळी तुडवून नागपूर-चंद्रपूर-बल्लारपूर टोल रोड लिमिटेड कंपनी टोल वसुली करीत आहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास नंदोरी, भटाळी व टोल

गावकऱ्यांचा इशारा : दिशाभूल सहन करणार नाही चंद्रपूर : पथकरासंदर्भात असलेल्या नियमांना पायदळी तुडवून नागपूर-चंद्रपूर-बल्लारपूर टोल रोड लिमिटेड कंपनी टोल वसुली करीत आहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास नंदोरी, भटाळी व टोल नाक्याच्या पाच किलोमीटर परिसरातील गावकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या परिसरातील गावकऱ्यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिला.२६ डिसेंबरपासून नंदोरी येथील पथकर नाका सुरू झाला आहे. या नाक्यावर नंदोरी, भटाळी, बोर्डा या परिसरातील वाहनांना सुट मिळण्याच्या मागणीवरून पहिल्या दिवसापासूनच संघर्ष सुरू आहे. गेल्या आठवड्यात टोल नाक्याचे अधिकारी आणि गावकऱ्यांमध्ये बैठक झाली होती. त्यात आठवडाभरात निर्णय घेण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र आठवडा उलटूनही निर्णय न झाल्याने गावकरी संतापले आहे. या संदर्भात बोलताना भटाळीचे सरपंच सुधाकर रोहणकर म्हणाले, स्थानिक वाहनासाठी सुट देण्याची तरतुद अन्यत्र असली तरी येथे मात्र चालढकल सुरू आहे. ४५ किलोमीटरच्या अंतरात टोल नाका नसावा असा नियम असला तरी ताडाळी ते नंदोरी या दोन्ही ठिकाणच्या टोल नाक्यातील अंतर फक्त ३० किलोमीटर आहे. ताडाळी ते विसापूर या दोन नाक्यातील अंतर १८ किलोमीटर आहे. परिसरात ७० वाहने आहेत. नंदोरी ग्रामपंचायतीने यापूर्वी ठरावही दिला आहे. नाक्यावर स्थानिकांना रोजगारातून डावलून बाहेरील युवकांना रोजगार देण्यात आला आहे. टोल नाक्यावरून बैलगाडी नेण्यासाठी जागाच नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या बाबी तातडीने विचारात न घेतल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला किशोर उमरे, रामदास विरूटकर, प्रशांत डाहुले, भाऊराव दंडारे, संजय बुराण, बालाजी चौधरी आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)