शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोच्ची-पाचगाव रस्ता केव्हा कात टाकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:42 IST

राजुरा तालुक्यातील कोच्ची-पाचगाव रस्ता मागील अनेक वर्षांपासून असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. परिसरातील नागरिकांना रस्त्याअभावी यातना सहन कराव्या लागत आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल : पाचगाव आरोग्य केंद्रात जाण्यासाठी अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील कोच्ची-पाचगाव रस्ता मागील अनेक वर्षांपासून असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. परिसरातील नागरिकांना रस्त्याअभावी यातना सहन कराव्या लागत आहे.कोच्ची-पाचगाव हा रस्ता दुर्लक्षित आहे. या मार्गावरून अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाचगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने नागरिकांना तिथे उपचारासाठी जावे लागते. मात्र, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले. त्यामुळे गरोदर महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याअभावी नागरिकांचे हाल होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रार करण्यात आली. पण, त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. गावाकडे जाण्यासाठी दुसरा मजबूत मार्ग नाही. या मार्गावर शेकडो शेतकºयांची शेती असल्याने पावसाळ्यात अनेक कामे अडतात. शेतावर बैलजोडी नेणेही कठीण होते. स्मार्ट सीटीच्या नावावर शहरातील रस्ते चकाचक करताना कोच्ची येथील नागरिकांना गावाकडे जाण्यासाठी पावसाळ्यात यातना सहन कराव्या लागतात. त्यामुळे शहरांचा विकास करताना ग्रामीण भागाचाही विचार करणे गरजेचे आहे. पण, जि.प.चा बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच कोच्ची-पाचगाव रस्त्याची दुरूस्ती करून समस्या सोडवावी, अशी मागणी उपसरपंच गोपाल जंबलवार, रूपेश गेडेकर, महेंद्र धोंगडे, शंकर पिपरे, सुभाष झाडे, रमेश जुलमे, वामन नमनकर, केशव झाडे आदींनी केली आहे.सावलहिरा-शिवापूर परिसरातही संतापकन्हाळगाव : कोरपना तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणारा शिवापूर ते राज्यसीमा तसेच सावलहिरा ते येल्लापूर या रस्तांची अवस्था अतिशय वाईट आहे. शिवापूरला जोेडणारा मार्ग तेलंगणा राज्य सीमेपासून गुळगुळीत झाला. पण, महाराष्ट्र हद्दीतील रस्ता जैसे-थे आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना २० किलोमीटर अतिरिक्त फेरा पडतो. यामध्ये वेळ वाया जाते. आर्थिक भुर्दंड बसतो. शिवापूर मांगलहिरा, थिप्पा, उमरहिरा, दुगार्डी आणि तेलंगणातील मांगरुड व पवनार आदी गावांसाठी हा रस्ता अत्यंत सोईचा व कमी अंतराचा आहे. सावलहिरा ते येल्लापूर या रस्त्याचेही तेच हाल झाले. वर्दळीच्या रस्त्यावर साधे मातीकाम करण्यात आले नाही. या मार्गाची दुरूस्ती केल्यास विकासाला चालना मिळू शकते. बहुतांश गावे आदिवासी व विकासापासून वंचित आहेत. बांधकाम विभागाने हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी केली जात आहे.