शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

चंद्रपुरातील मार्गांवरून बस कधी धावणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST

पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र तरीसुद्धा कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे सुमारे १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर ९५ च्या जवळपास कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. केवळ यांत्रिक विभागातील व इतर विभागातील २०० च्या जवळपास कर्मचारी कर्तव्यावर आले. परंतु, चालक-वाहक अद्यापही कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे एकही बस आगाराबाहेर निघत नाही. परिणामी प्रवाशांना अडचणींची सामना करावा लागत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यसेवेत विलीनीकरण करावे, यासाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपाला दोन महिन्यांचा कालावधी लोटला असूनही कर्मचारी कर्तव्यावर येण्यास तयार नाही. परिणामी प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. याऊलट काही जिल्ह्यात थोड्या प्रमाणात का होईना एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या सुरू आहे. त्यामुळे चंद्रपुरातील मार्गावरून बस कधी धावणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू केला आहे. संप मोडीत काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून अनेकदा प्रयत्न करण्यात आले. पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र तरीसुद्धा कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे सुमारे १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर ९५ च्या जवळपास कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. केवळ यांत्रिक विभागातील व इतर विभागातील २०० च्या जवळपास कर्मचारी कर्तव्यावर आले. परंतु, चालक-वाहक अद्यापही कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे एकही बस आगाराबाहेर निघत नाही. परिणामी प्रवाशांना अडचणींची सामना करावा लागत आहे. 

एकही बस धावत नाहीराज्यामध्ये काही ठिकाणी महामंडळाच्या बसफेऱ्या धावत आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील चारही आगारातून एकही बस धावत नसल्याचे वास्तव आहे. 

एकाच दिवशी धावल्या होत्या दोन बसमागील पंधरवाड्यापूर्वी चंद्रपूर आगारातून एक व वरोरा आगारातून एक अशा दोन बस धावल्या होत्या. मात्र चंद्रपूर आगारात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दोघांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. 

एकही चालक वाहक कर्तव्यावर येत नसल्याने बसफेऱ्या बंद आहे. इतर विभागातील जवळपास २०० कर्मचारी कर्तव्यावर आहेत. दररोज आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना भेटून कर्तव्यावर येण्यास सांगत असते. -स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक नियंत्रक, चंद्रपूर

एसटीविना प्रवासाची सवय लागते की काय?

पूर्वी दररोज बसनेच प्रवास करायचो. संपापासून खासगी वाहनातून प्रवास करीत आहे. पूर्वी थोडीफार अडचण व्हायची. मात्र आता सवयच झाल्यासारखी वाटते. महामंडळाच्या संपामुळे खासगी वाहने वाढल्याने आता लवकर ट्रॅव्हल्स मिळते.- प्रशांत खोब्रागडे, प्रवासी

एसटी महामंडळाचा संप सुरू होण्यापूर्वीपासूनच मी ट्रॅव्हल्सने प्रवास करतो. ट्रॅव्हल्समध्ये टीव्ही किंवा साऊंड बॉक्स लावून मनोरंजनात्मक प्रवास करता येत असल्याने तसेच बसपेक्षा कमी तिकीट असल्याने मला ट्रॅव्हल्सचाच प्रवास आवडतो.- अजित गेडाम, प्रवासी

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप